तिर्थक्षेत्र त्रिवेणी मंदिरावर गुरू पौर्णिमेनिमित्त भंडारा व शाहीस्नान संपन्न विश्राम तेले चौगाव ( प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवा...
तिर्थक्षेत्र त्रिवेणी मंदिरावर गुरू पौर्णिमेनिमित्त भंडारा व शाहीस्नान संपन्न
विश्राम तेले चौगाव ( प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक १०जुलै रोजी आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तिर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिरावर गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळ पासूनच स्नानासाठी भाविकांची गर्दी होती.यात हजारो भाविकांनी तिर्थक्षेत्रावर स्नान केले.तसेच गावातील भाविकांनी भंडार्याचे देखील आयोजन केले होते.
परीसरातील लासुर,चुंचाळे,मामलदे,कृष्णापूर,कर्जाने येथील भाविकांनी तिर्थस्नान व महाप्रसादाचा लाभ घेतला.दिवसेंदिवस पर्यटकांची वाढती संख्या बघता या तिर्थक्षेत्राचा विकास होऊन अनेक सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.खास करून रस्त्याअभावी भाविकांना खुपच अडचणींचा सामना करावा लागतो.या तिर्थक्षेत्राला ब दर्जा मिळावा तसेच या सर्व मुलभूत सुविधा जसे रस्ता,स्नानगृह, शौचालय, भक्त निवास, बगिचा, लहान मुलांना खेळणी,स्वच्छ पाण्याची सोय, पॅगोडा, बैठक आसन, निरीक्षण मनोरा,संरक्षण भिंत, ठिक ठिकाणी संरक्षण कठडे व सभामंडप आदी सुविधा व्हाव्यात हिच परीसरातील भाविकांची मागणी आहे.
No comments