पती सतत चारित्र्यांचा संशय घ्यायचा, अखेर पत्नीने पतीचा काढला काटा..!! जायखेडा पोलिसांनी पत्नीच्या आवळल्या मुसक्या...!! सौ. कलावती गवळी (...
पती सतत चारित्र्यांचा संशय घ्यायचा, अखेर पत्नीने पतीचा काढला काटा..!! जायखेडा पोलिसांनी पत्नीच्या आवळल्या मुसक्या...!!
सौ. कलावती गवळी ( नाशिक जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे सतत चारित्र्याचा संशय पती कैलास जिजाऊ पवार (वय 45) आपल्या पत्नीवर घेत असल्याच्या रागांच्या भरात अखेर पत्नीने आपल्या पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील दरेगांव येथून उघडकीस आली आहे, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी मृत पतीच्या आरोपी पत्नी मनीषा कैलास पवार हिला जायखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, सदर मूर्त पतीच्या पत्नीला जायखेडा पोलिसांनी अटक केली आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंग सिंधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. अधिक तपास स.पो.नि. सागर काळे करीत आहेत.
No comments