यावल तालुक्यात नीधी अभावी घरकुलाचे काम रखडले लाभार्थी मारतात पंचायत समीतीमध्ये चकरा भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) याव...
यावल तालुक्यात नीधी अभावी घरकुलाचे काम रखडले
लाभार्थी मारतात पंचायत समीतीमध्ये चकरा
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : ग्रामीण भागातील लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधान मत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मजुर होऊन पहिला हप्ता मिळला मात्र दुसरा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष वेधून आहे
यावल पंचायत समीती मध्ये २३ जून रोजी यावल - रावेर विधानसभा मतदारसंघ आ अमोल जावळे व चोपडा विधानसभा मतदारसंघ आ प्रा चंद्रकात सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जि.प मुख्यध्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण सभा घेण्यात आली होती या सभेत तालुक्यात पाच हजार घरकुल मंजूर असून पहिला हप्ता / दुसरा हप्ता किती लाभार्थ्याना वितरीक करण्यात आला यांचा आढावा घेण्यात येवून पहिला हप्ता वितरीक झालेला असलेल्या लाभार्थ्याच्या समस्यां जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून घरकुलाचे काम सुरू करून अनुदान देण्यात यावे अशी सूचना बैठकीत करण्यात आली सभा होऊन १५ दिवस झाले तरी सुध्दा लाभार्थ्यांना दुसरा हप्ताच्या नीधी अद्यापही वितरण झाला नसल्यामुळे नीधी अभावी घरकुलाचे काम रखडले आहे
पहिला हप्ता पंधरा हजार रुपये मिळाले त्यात थोडे फार काम करण्यात आले विटा रेती न कारागीर यांना देण्यासाठी लाभार्थ्या जवळ पैसे नसल्याने लाभार्थी हतबल झाले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिवाळी पर्यंत घरकुलांचे उदिष्ट्र पुर्ण करण्याने टार्गेट अधिकारी यांना दिले असून लाभार्थ्यांना नीधीच वेळेवर मिळत नाही तर वेळेवर उद्दीष्ट साध्य कसे होणार असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे.लाभार्थ्याना घरकुलाचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी नीधी मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे
No comments