आयपीएस अधिकारी नयोमी साटम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती..!! सौ. कलावती गवळी ( सिंधुदुर्ग जिल्हा ) प्रतिनिध...
आयपीएस अधिकारी नयोमी साटम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती..!!
सौ. कलावती गवळी ( सिंधुदुर्ग जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कृषिकेश रावले यांची पुण्याला बदली झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक पद चांगलेच रिक्त होते. आणि याच पदावर शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या नयोमी दशरथ साटम यांची पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली असून नव्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे. साटम या मुळच्या कणकवली तालुक्यांतील पिसेकामते-फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. त्यांचे मूळ गांव पिसेकामते-फळसेवाडी असले तरी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे दहिसर मुंबई येथे झाले आहे. नवीन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम मुंबई येथील बोरवली ( पूर्व ) येथे सध्या स्थायिक आहेत. 2021 बॅचच्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्या आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नव्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या आहेत. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांची पुण्याला बदली झाल्याने हे पद रिक्त होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिनाभरांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर नव्याने रुजू झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस यंत्रणेचे दोन्ही प्रमुख अधिकारी नव्या दमाचे असल्याने त्यांच्याकडून कशाप्रकारे कारभार हाकला जातोय हे पुढील काही दिवसांत सिंधुदुर्गकरांना दिसून येणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातसह कणकवली परिसर तसेच सर्व स्तरांतून अभिनंदन वर्षाव होत आहे.
No comments