adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दहशतवाद विरोधी पथकाने रांजणगाव MIDC मधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 04 बांगलादेशीना घेतले ताब्यात दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलिस स्टेशनची संयुक्त कारवाई..!!

 दहशतवाद विरोधी पथकाने रांजणगाव MIDC मधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 04 बांगलादेशीना घेतले ताब्यात दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलिस स्ट...

 दहशतवाद विरोधी पथकाने रांजणगाव MIDC मधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 04 बांगलादेशीना घेतले ताब्यात

दहशतवाद विरोधी शाखा आणि रांजणगाव पोलिस स्टेशनची संयुक्त कारवाई..!!


 सौ.  कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 11 जुलै 2025 रोजी दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकांसह रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरांमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांचे पथकांतील पो.कॉ मोसीन शेख व पो.कॉ ओंकार शिंदे, ह्यांना गोपनीय माहिती मिळाली की रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी इसम रहात असल्याची अशी माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीवरून पथकांने पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे पोलीस अधीक्षक  यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या स्टाफसह कारेगाव येथून 04 पुरुष ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर बाबत अधिक पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अप्पर पोलीस  पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर  पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहा पोलीस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे, पो.हवा विशाल भोरडे, पो.हवा रवींद्र जाधव, पो.कॉ मोसीन शेख , पो.कॉ ओंकार शिंदे  तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन चे  पोसई. अविनाश थोरात, सहा. फौजदार डी.आर.शिंदे, पोकॅा/ वय.ए.गुंड,पोकॅा/ एस.एस.साळुंके मपोकॅा/ आर.डी.भोजने या पथकांने केली.

No comments