पोलीस ठाण्यातच विषप्राशन करून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि२१):-अह...
पोलीस ठाण्यातच विषप्राशन करून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२१):-अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील एका २६ वर्षीय तरुणीने थेट पाथर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि.२०) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.सदरील घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचल्याची माहिती आहे.ही तरुणी रविवारी दुपारी थेट पाथर्डी पोलीस ठाण्यात आली होती.तिच्याकडे विषाची बाटली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या लक्षात आले.त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने महिला पोलिस कर्मचाऱ्यांना पाचारण केले. ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी चंद्रावती शिंदे आणि स्मिता सानप या दोन महिला पोलिसांनी तत्काळ धाव घेत युवतीच्या हातातील विषाची बाटली हिसकावली.यामुळे विष खाली सांडले व युवतीचे प्राण वाचले. परंतु थोडेफार विष तोंडात गेल्याने तिची प्रकृती खालावली. पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला पोलीस वाहनातून पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तेथे तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले.मात्र,अधिक प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
No comments