शालेय प्रभावित फेर्या नाहाटा चौफुलीमार्गे पांडूरंग टॉकीजपर्यंत करण्यात याव्या -:- सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप भुसाव...
शालेय प्रभावित फेर्या नाहाटा चौफुलीमार्गे पांडूरंग टॉकीजपर्यंत करण्यात याव्या -:- सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ - येथील बाजारपेठ पोलिस ठाणे ते अमर स्टोअर पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता भुसावळ तालुक्यातील शालेय प्रभावित फेर्या नाहाटा चौफुलीमार्गे पांडूरंग टॉकीजपर्यंत करण्यात याव्या अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ जळगावचे विजय गीते यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे. तसेच आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, भुसावळ तालुक्यातील बरेच विद्यार्थी तालुक्यातून भुसावळ शहरात शिकण्यासाठी येतात. तसेच त्यामधील बरेचशे विद्यार्थी लहान असून नाहाटा कॉलेज पासून ते शाळेपर्यंत पायी येतात व अशावेळी रोडवर असलेल्या वाहतूकीमुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच विद्यार्थीनीवर काही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील शालेय प्रभावित फेर्या जामनेर रोड नाहाटा चौफुली ते पांडूरंग टॉकीजपर्यंत किंवा शाळेपर्यंत पूर्ववत करण्यात याव्या, अशी नम्र विनंती विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ जळगावचे विजय गीते यांना दिलेल्या निवेदानात करण्यात आली आहे. तसेच याबाबत आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे याबाबत झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव मला देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली आहे.
No comments