adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत एक वर्षासाठी स्थानबद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई…

  कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत एक वर्षासाठी स्थानबद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई… सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (...

 कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत एक वर्षासाठी स्थानबद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई…


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.३०):-शहरातील सराईत गुन्हेगार बंटी ऊर्फ भावेश अशोक राऊत (रा.माणिक चौक) याच्या विरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.बंटी राऊत याच्याविरूद्ध शहरातील तोफखाना,कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 11 गुन्हे दाखल आहेत.यामध्ये खंडणी,सरकारी कामात अडथळा आणणे,शस्त्र बाळगणे, दंगा,दरोडा आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.राऊत याच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांकडून मागविण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेऊन बंटी राऊत विरोधात ही कारवाई केली आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने राऊत याला अटक करून नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले आहे.सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  दिनेश आहेर, पोसई तुषार धाकराव, स.फौ.रविंद्र पांडे, पोहेकॉ.सुरेश माळी, पोहेकॉ/ संदिप पवार, पोहेकॉ/शाहिद शेख, पोकॉ/रविंद्र घुंगासे, पोकॉ/ विशाल तनपुरे, पोकॉ/रमिझ आतार, सफौ/महादेव भांड व कोतवाली पोलीस स्टेशनचे मपोहेकॉ/शिल्पा कांबळे व पोकॉ/राहुल मासाळकर यांनी केली आहे.

No comments