श्री प्रसाद फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्री प्रसाद फाउं...
श्री प्रसाद फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री प्रसाद फाउंडेशनच्या वतीने 21 रोजी यावल तालुक्यातील कोळवद व वड्री धरण येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील गरजू व आदिवासी पाड्या वरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल, पट्टी, शार्पनर आदी साहित्याचा समावेश होता.
सदर संस्था मागील पाच वर्षांपासून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक व प्रेरणादायी कार्य करत आहे. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, त्यांचे शालेय उपस्थितीचे प्रमाण सुधारावे या उद्देशाने संस्थेमार्फत पालक सभा, शालेय शिबिरे यांचे आयोजन नियमितपणे केले ~जाते.तसेच जि प मुला मुलींच्या शाळेत पटसंख्या वाढण्यास मदत व्हावी या उद्देशाने कार्य करण्यास येत आहे
कार्यक्रमाला मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलच्या संस्थापक श्रीमती नीता गजरे मॅडम यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन बरडे, सचिव सौ. भारती बरडे, जि.प. शिक्षक किशोर भोई, शिक्षिका मनीषा तडवी, सरपंच मुमताज तडवी, तसेच संस्थेचे प्रतिनिधी राकेश पाटील, सुरज पाटील, सामाजिक कार्यकर्ता अशोक तायडे, संजय टोकरे, महेश अहिरे, नदसिंग पाटील, प्रा. डिगंबर महाजन, अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन श्री प्रसाद फाउंडेशनतर्फे करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments