फैजपूरच्या प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूच्या आवारात कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचे प्रेत आढळले इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
फैजपूरच्या प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूच्या आवारात कुजलेल्या अवस्थेत पुरुषाचे प्रेत आढळले
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस अंगावर किडे पडलेले कुजलेल्या अवस्थेत ४० ते ४५ वर्षाचा इसम मिळून आल्याची घटना दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मिळून आल्याने खळबळ परिसरात निर्माण झाली आहे. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला आकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. वृत्त असे की दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सकाळी १०वाजेच्या सुमारास फैजपुर पोलीस स्टेशनला खबर देणार राकेश डीगंबर कोरोशिया सफाई कामगार हा त्यांचे प्रांत कार्यालयात नेहमीप्रमाणे ड्युटी कामे करण्याकरता गेला असता प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस दुर्गंधीयुक्त वास आल्याने त्याचे सोबतीचे सफाई कामगार आशिष पचरदार, पिंटू हंसकर ,अर्जुन चावरे व इतरांनी त्यांच्यासोबत प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक अनोळखी इसम नाव, गाव, माहित नाही. वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष वयाचा इसम अंगावर किडे पडलेले कुजलेल्या स्थितीत मिळून आला. सदर इसम प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस का गेला ? कशाकरता गेला ? की सदर इसम भिकारी आहे का ? किती दिवस मृत अवस्थेत असावा ? इमारतीच्या मागील बाजूस खिडक्या असल्याने प्रात व नगरपालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुर्गंधी का आली नाही ? हा एक चर्चेचा विषय सुरू आहे. याबाबत फैजपूर पोलिस्टेशनला राकेश डीगंबर कोरोशिया या सफाई कामगाराने फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ए पी.आय. रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहे.
No comments