प्रा. डॉ. एच. जी. भंगाळे यांची उपप्राचार्य पदी नियुक्ती. भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसा...
प्रा. डॉ. एच. जी. भंगाळे यांची उपप्राचार्य पदी नियुक्ती.
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील पदार्थ विज्ञान विषयाचे प्राध्यापक डॉ. एच. जी. भंगाळे यांची नुकतीच 'उपप्राचार्य' पदी नियुक्ती झाली. त्यांची या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्र प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांनी त्यांचा सत्कार व अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील, श्री. मिलिंद बोरखडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या या यशस्वी नियुक्तीबद्दल सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून डॉ भंगाळे यांची ओळख आहे. आय. क्यु. ए. सी. समन्वयक तसेच महाविद्यालयाच्या विविध समित्यांवर देखील त्यांच्या कामाची झलक उठून दिसते.
No comments