_धरती आबा योजना अंतर्गत, होणार पाड्यांचा कायापालट प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान २०२५ जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...
_धरती आबा योजना अंतर्गत, होणार पाड्यांचा कायापालट
प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान २०२५
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्ह्यातील ११२ गावाचा सहभाग. गेल्या दोन महिन्यांपासून धरती आबा योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले. त्या माध्यमातून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मा.रक्षाताई खडसे, केंद्रीय राज्यमंत्री - युवा कल्याण व क्रीडा मंत्री, आमदार चोपडा प्रा.चंद्रकांत सोनवणे, जळगाव खासदार स्मिता वाघ, आमदार राजुमामा भोळे, आमदार रावेर अमोल जावळे, आमदार भुसावळ संजय सावकारे, आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव, मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी मार्गदर्शन करुन योजना आदिवासी जमातीतील शेवटच्या घटकापर्यंत विकास व लाभ देण्याचे आवाहन केले आहे.
त्या अनुषंगाने निवड केलेल्या १२ तालुक्यातील ११२ बारा गावांतील आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा सर्वे करून, त्यांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल व चोपडा या तालुक्यात अनुसूचित क्षेत्र लागू असल्याने, या योजनेत केंद्राकडून अधिक गावांची निवड केली आहे. ही पेसा गावे दुर्गम भागात वसलेले आहेत. या पेसा गाव अंतर्गत अनेक वाडी, पाडे, वस्ती हे डोंगर दऱ्यात वास्तव्य करून राहतात. ह्या वस्त्या किमान ५० वर्षाहून अधिक काळाने वास्तव्याला आहेत. आजही तेथे मूलभूत सुविधांचा अभाव आढळून येतो. इत्यादी जन सुविधांची पूर्तता विकास या योजनेतून साधता येणार आहे.
त्याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी जमाती समाजाचा सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने दिनांक.२०.०७.२०२५ रोजी चोपडा तालुक्यातील मौजे देव्हारी ग्रामपंचायत अंतर्गत बोरमळी, देवझिरी व त्या भागातील वाडी, वस्ती, पाडे येथे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत एकत्रित सभेचे आयोजन प्रदिप बाविस्कर, जिल्हा व्यवस्थापक (पेसा) जिल्हा परिषद जळगाव यांनी केले.
अनुसूचित जमातींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर सभा यशस्वीपणे संपन्न करण्यात आले. या योजनेत सामुदायिक योजनांर्गत गावाला, पाड्याला, वस्तीसाठी स्मशान भुमी, पोहच रस्ते, सात्वन शेड बांधकाम, स्मशान भुमी संरक्षण भिंत, गाव अंतर्गत सार्वजनिक शौचालये मुतारी बांधकाम, वाढीव अंगणवाडी व जि.प.शाळा यांना आवश्यक सुविधा, सार्वजनिक समाज मंदीर, सोलर चलित उपकरणे, जमीन सुरक्षा कामे, जल पातळी संवर्धन कामे, वृक्ष लागवड ग्रामपंचायत कार्यालयांना सुविधा व विकास, शेती विकास, गाव लगत व अंतर्गत जोड रस्ते, नदी नाल्यावर वाहतुक साठी पुल बांधकाम, ग्रामपंचायत विभाजन प्रस्ताव, वाडी वस्ती पाडे यांचा महसूल गावाचा प्रस्ताव, वनहक्क कायदा अंतर्गत वाढीव गावठाण मागणी, दुर्गम भागात दूरसंचार प्रणाली (मोबाईल टॉवर उभारणी) विकसित करणे. इ बाबत कामांची मागणी सभेत मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांकडून करणेत आली. तसेच वैयक्तिक लाभ जसे की, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळेचा दाखला, महसुल दाखले, जातीचे दाखले इ. बाबत शिबिर आयोजित करण्यात येणार असून तेथे नोंदणी करून लाभ घेण्याचे आवाहन प्रदिप बाविस्कर यांनी केले.
यावल रावेर व चोपडा येथील पेसा ग्रामपंचायत अधिकारी अशाप्रकारे सभा आयोजित करून आराखडा तयार करणे. व वंचितांना लाभ द्यावा.
यां कामांचे प्रस्ताव त्वरित ग्रामपंचायती मार्फत आराखडा मंजूर करून पंचायत समितीकडे सादर करण्या बाबत नियोजन केले. इ माहिती प्रदिप बाविस्कर यांनी ग्रामस्थांना दिली.
सदर सभा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी यावल यांचे आदेशानुसार घेण्यात येत आहेत.
यावेळी देव्हारी सरपंच सौ.जुनाबाई किसनपाडवी, मेलाणे सरपंच प्रताप पावरा, गोहमाल पाटील नाना महाराज, प्रल्हाद पाडवी, देव्हारी गाव पाटील श्री.बाबुराव काका पाडवी, जळगांव जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक- पेसा श्री.प्रदिप बाविस्कर, चोपडा तालुका व्यवस्थापक श्री.शरद सपकाळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री.ओनारसिंग बारेला, मेलाणे ग्राम पंचायत अधिकारी सौ.राधा चव्हाण सर्व पाड्यांचे गाव पाटील, महिला सदस्य मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. काम मागणी बाबत आराखडा तयार करण्यात आला.
जिल्हा व्यवस्थापक पेसा प्रदिप आर. बाविस्कर
No comments