चिनावल शिवारात सुमारे ३५०० केळीची खोडे कापून उध्वस्त; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
चिनावल शिवारात सुमारे ३५०० केळीची खोडे कापून उध्वस्त; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील चिनावल येथील शेतकरी बांधवाचे कोण्या अज्ञात व्यक्तींनी जुना सावदा रस्त्यालगत असलेल्या शेतकरी खेमा कामा पाटील यांच्या शेतातील सुमारे ३५०० केळीची खोडे कापून उद्ध्वस्त करून टाकल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
रावेर तालुक्यातील चिनावल येथील शेतकरी खेमा कामा पाटील यांच्या चिनावल सावदा जुन्या रोडवर असलेल्या शेतातील सुमारे ३५०० केळीची नवती ची खोडे कोण्या अज्ञात व्यक्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त करण्यात आली. यामुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने शेतकरी खेमा पाटील यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरचे केळीचे नुकसान कोणी केले याचा शोध तपास सावदा पोलिस घेत आहेत. शेतीचे नुकसान करणाऱ्या घटना चिनावल परिसरात नेहमीच घडत असतात. या अशा घटनांना कायमचा पायबंद घालावा अशी मागणी परसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
No comments