१५ जुलै रोजी अहिल्यानगर येथे पंडित दीनदयाल रोजगार मेळावा जिमाका वृत्तसेवा/ अहिल्यानगर: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जिल्ह्यातील उमेदवारां...
१५ जुलै रोजी अहिल्यानगर येथे पंडित दीनदयाल रोजगार मेळावा
जिमाका वृत्तसेवा/ अहिल्यानगर:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी १५ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर, अहिल्यानगर येथे पंडित दीनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.
मेळाव्यात जिल्ह्यातील सन फार्मा फार्मास्युटिकल्स, जी.के.एन. सिंटर मेटल्स, इटॉन इंडस्ट्रियल सिस्टिम्स, एक्साईड इंडस्ट्रीज आणि क्लासिक व्हील्स या पाच नामांकित कंपन्यांचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड करणार आहेत.
एचएससी, सर्व शाखेतील पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा आणि डिग्रीधारक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करून पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच www.ncs.gov.in या संकेतस्थळावरही नाव नोंदवून सहभाग नोंदवावा व संधीचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी रोजगार मेळावा समन्वयक वसीमखान पठाण (९४०९५५५४६५), संतोष वाघ (८८३०२१३९७६), बद्रीनाथ आव्हाड (९४२०७२५२८०) आणि योगेश झांजे (९५८८४०८८९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments