पालकांनी केली अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग नाशिक यांचेकडे तक्रार जामनेर येथील आदिवासी नामांकित शाळा जैन इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक...
पालकांनी केली अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग नाशिक यांचेकडे तक्रार
जामनेर येथील आदिवासी नामांकित शाळा जैन इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षणात भेदभाव करण्याचा आरोप
नाशिक प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जामनेर तालुक्यातील जैन इंटर नॅशनल स्कुल पडासखेडा येथील इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये खाजगी मुले आणि नामांकित आदिवासी मुलं असे शिक्षण घेत असताना त्यामध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल आदिवासी विभागाकडून इ 1ली ते 10 वीचे मुलं मुली एकूण 288 विद्यार्थी शिक्षण घेत आहे, परंतु त्याठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांना, शैक्षणिक,आरोग्य व स्वच्छता, या सुविधा मिळत असल्याने पालकांनी मागील पाच वर्षापासून वारंवार आदिवासी प्रकल्प यांच्याकडे तक्रारी सादर करीत असून आदिवासी कार्यालयास त्यांनी वारंवार नोटीस द्वारे समज दिली,परंतु ते याबाबतीत काही सुधारणा करण्यास तयार नाहीत. त्याचप्रमाणे खाजगी विद्यार्थी फी देऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ते चांगलं प्रकारचं शिक्षण देत आहे,परंतु आदिवासी विद्यार्थ्यांना अजिबात चांगले प्रकारचे शिक्षण दिले जात नाही. मात्र फी सारखीच घेतली जाते तरी यावरून असं दिसतं की आदिवासी विद्यार्थ्यां वरती भेदभाव होताना दिसत आहे. तसेच शिक्षणाचा व आरोग्याचा अधिकार हा आमचा मूलभूत हक्क असल्याने प्रथम समाजाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, आमच्या मुलांच्या भविष्याच्या विचार करून आपण तात्काळ एकात्मिक आदिवासी प्रकल्प यांच्या चौकशी अहवालावर तात्काळ कारवाई करून विद्यार्थींचे दुसऱ्या शाळेत समायोजन करावे अशी मागणी करत थेट पालकांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग नाशिक कार्यालय गाठले.व निवेदन सादर करतेवेळी श्री प्रमोद बारेला उप सरपंच, पालक, तुळशीराम बारेला, मोतीराम बारेला,रमोद पावरा, रवीन बारेला, मिरचंद बारेला हे होते.
No comments