adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चमगाव येथील शेतकऱ्यांच्या समज्यसाने मंडळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेत रस्ताने घेतला मोकळा श्वास.

 चमगाव येथील शेतकऱ्यांच्या समज्यसाने मंडळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेत रस्ताने घेतला मोकळा श्वास. शेतकऱ्यांनी शेत रस्ते मोकळा करून शासनाच्या...

 चमगाव येथील शेतकऱ्यांच्या समज्यसाने मंडळ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेत रस्ताने घेतला मोकळा श्वास.

शेतकऱ्यांनी शेत रस्ते मोकळा करून शासनाच्या विविध योजनांच्या लाभ घ्यावा ----- प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेत रस्ता अखेर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने मोकळा 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : तालुक्यातील चमगाव येथील शेत रस्त्यांच्या प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. अखेर प्रांत अधिकारी मनोज कुमार गायकवाड व धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने  गावठाण पासून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा शेत रस्ता गट नंबर 9, 10, 18, 19, 20, 21, 22, 23, चे बांधाणे जाणारा बोरी नाल्यापर्यंतच्या जाणारा शेत रस्ता अतिशय विखुरलेला होता हा शेत रस्ता चमगाव येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कुठलाही वाद न करता समज्यसाने मंडळ अधिकारी मोहन महाजन यांच्या उपस्थितीत मोकळा करण्यात आला. हा रस्ता मोकळा झाल्यामुळे जवळ जवळ ७०,८० शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे.  यावेळी चमगाव येथील शेतकरी, सोनवद मंडळ अधिकारी मोहन महाजन, ग्राम महसूल अधिकारी दीपक पाटील, ग्राम महसूल सेवक, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस पाटील चमगाव, इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. हा शेत रस्ता मोकळा झाल्याने चमगाव येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले व्यक्त केले आहेत.

No comments