मार्केट यार्ड भागांतून दुचाकी चोरणाऱ्या आरोपींच्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!! स्वारगेट पोलिसांची कामगिरी ! संभाजी पुरीगोसावी ...
मार्केट यार्ड भागांतून दुचाकी चोरणाऱ्या आरोपींच्या स्वारगेट पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!! स्वारगेट पोलिसांची कामगिरी !
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे शहरांतील मार्केटयार्ड भागांतून दुचाकी चोरणाऱ्या आरोपींच्या स्वारगेट पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींस अटक करून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. राज परमेश्वर कदम असे अटक करण्यात आलेल्या वाहन चोरांचे नाव आहे. मार्केटयार्ड परिसरांतून दुचाकी चोरण्यात आल्या होत्या. चार दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राच्या कार्यालयासमोर दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने स्वारगेट पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. स्वारगेट पोलीस पेट्रोलिंग करीत असताना कदम याने दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून राज कदम याला ताब्यांत घेतले त्याच्याकडूंन दोन दोन चाकी जप्त करण्यात आल्या. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे प्रादेशिक विभाग पुणे सहाय्यक पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-2 मिलिंद मोहिते सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास भारमळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे अश्रूंबा मोराळे संग्राम केंद्र संदीप घुले हनुमंत दुधे फिरोज शेख प्रशांत टोणपे रमेश चव्हाण दिपक खेंदाड सुजय पवार आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
No comments