चोपडा तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती समारंभ अमळनेर येथे संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायक...
चोपडा तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती समारंभ अमळनेर येथे संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संघटनेच्या नियुक्ती समारंभ लोकमान्य टिळक सभागृह येथे पार पडला. उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. बी. बी. भोसले साहेब व जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापित अखिल भारतीय मराठा महासंघ अंमळनेर व चोपडा तालुका पदाधिकारी आयोजित विविध पदावर नियुक्ती व जबाबदारीचे नियोजन करण्यात आले . मराठा महासंघ पदाधिकारी समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले व उपाध्यक्ष विश्वास पाटील , व लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील, उमेश पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष जळगाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले . व्यासपीठावरील मान्यवर यांच्या हस्ते प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले .
त्यानंतर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदगाव लाडगावचे लोकनियुक्त सरपंच दामोदर पाटील यांनी केले आभार पर भाषण मेहेरगावचे माजी सरपंच शरद पाटील यांनी केले. या कार्यक्रमात नवनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे चोपडा तालुका अध्यक्ष ग्रामीण कृष्णा सोनवणे , उपाध्यक्ष सुयश पाटील , सचिव ज्ञानेश्वर सोनवणे , संघटक पंकज सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments