adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा निमित्त कीर्तनाचे आयोजन

 श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा निमित्त कीर्तनाचे आयोजन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा --- श्री संत श...

 श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा निमित्त कीर्तनाचे आयोजन


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा --- श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळानिमित्त श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज बांधव आयोजित किर्तन सोहळा दिनांक १७ जुलै गुरुवार रोजी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची स्थापना माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे या दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल १७ जुलै रोजी ह भ प लक्ष्मण महाराज तांदलवाडी, १८ जुलै रोजी  ह भ प कीर्तीताई पाटील चोपडेकर, १९ जुलै रोजी ह भ प धनराज महाराज कोळपिंपरी, २० जुलै रोजी ह भ प गजानन महाराज सोनटके पारोळा, २१ जुलै रोजी  ह भ प वंदनाताई माळी चिमठाणे, २२ जुलै रोजी  ह भ प योगेश महाराज वाघाडीकर, २३ जुलै रोजी ह भ प गजानन महाराज चौगावकर यांचे काल्याचे किर्तन लाभ मिळणार आहे, आणि दिनांक १९ जुलै शनिवार रोजी सायंकाळी ६:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालय या ठिकाणी माळी समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा होणार आहे, त्याचबरोबर दैनंदिन सप्ताह काकड आरती संध्याकाळी हरिपाठ होणार आहे दिनांक २३ जुलै बुधवार रोजी सात ते आठ हजार भाविक बंधू सह सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाच्या आयोजन केले आहे महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा त्याचबरोबर संध्याकाळी शहरातील विविध भागातून पालखी मिरवणूक सोहळा निघणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा अशी श्री फुलमाळी समाज सुधारणा समस्त पंचमंडळ व सर्व समाज बांधव च्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे...

No comments