जनसुरक्षा अधिनियम मागे घेण्यात यावे.. लातुरातील विधिज्ञाचे राज्यपालांना निवेदन.. लातूर,दि.२०(उत्तम माने ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
जनसुरक्षा अधिनियम मागे घेण्यात यावे.. लातुरातील विधिज्ञाचे राज्यपालांना निवेदन..
लातूर,दि.२०(उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जनसूरक्षा अधिनियम २०२४ विधिमंडळात पारित करण्यात आले आहे. हे विधेयक भारतीय नागरिकांची मुस्कटदाबी करणारे असल्यामुळे नागरिकांमध्ये सर्वत्र असंतोष व्यक्त केला जात आहे. हे विधेयक मागे घेण्यात यावे या मागणीसाठी लातूर जिल्हा न्यायालयातील अनेक विधिज्ञाने राज्यपाल महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी हा कायदा करीत असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधात, या विधेयकामुळे सरकारच्या हातात कारवाईचे बेसुमार अधिकार एकवटणार आहेत. सरकारी धोरणांच्या विरोधात संविधानिक मार्गाने आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनांना राज्य सरकार बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कारवाई करू शकणार आहे. यांत दोन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा व अशी व्यक्ती, व्यक्तीचे नातेवाईक व अशा संघटनांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अमर्याद अधिकार या विधेयकाअन्वये राज्य सरकारला प्राप्त होणार आहेत.
राज्य सरकारच्या धोरणांची व निर्णयांची कोणत्याही प्रकारची चिकित्सा करणे यामुळे अशक्य होणार आहे. केवळ राजकीय पक्ष किंवा संघटनाच नव्हे,तर पत्रकार, बुद्धिजीवी, कवी, लेखक, यूट्यूब चैनल असे कुणीही सरकारच्या धोरणाची चिकित्सा करू शकणार नाहीत. सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर सरकार या कायद्यान्वये कारवाई करू शकणार आहे.
संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारावर हा घाला आहेच, शिवाय सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींचा संकोच करणारी ही कृती आहे. हे जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले असले,तरी त्यावर मा. राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरी करू नये. कारण हे लोकशाहीविरोधी व संविधानविरोधी विधेयक आहे, अशी मागणीही अनेक विधिज्ञानीं केली आहे.
निवेदनावर
ॲड.एम.डी ठाकूर, ॲड.श्रीपती चव्हाण, ॲड.राम गजधने, ॲड.सचिन कांबळे, ॲड.शिवकुमार बनसोडे, ॲड.राजेंद्र लातूरकर, ॲड.प्रशांत गायकवाड, ॲड.अंगद निकम, ॲड.अनुप पात्रे, ॲड.पठाण सरफराज, गर्जे दत्ता, ॲड. व्ही.डी जाधव, ॲड.गणेश यादव, ॲड.यु.जी गवारे, ॲड.बी.बी बिरादार, ॲड.जैनु शेख, ॲड.सुनंदा मोठे, ॲड.एस.आय शेख, ॲड.आर्षद पटेल पठाण, ॲड.आर.जी गायकवाड, ॲड.नामदेव जी. गायकवाड, ॲड.निवृत्ती बी.जाधव, ॲड.सागर तांदळे, ॲड.अविनाश कांबळे, ॲड.बी. व्ही. सिंगापुरे, ॲड.एल.जे दरेकर, ॲड.एस.बी सूर्यवंशी, ॲड.बी.वी जाधव, ॲड.डी.एस मेटे, ॲड.ए.एल पटेल, ॲड.एस.बी सूर्यवंशी, ॲड.बी.व्ही.जाधव, ॲड.एन.एस देशमुख, ॲड.एन.एच.शेख, ॲड.ए.आर.टेकाळे, ॲड.पी.बी.शिंदे, ॲड.ए.के.कांबळे, ॲड.आर.टी.सुवर्णकार, ॲड.पी.डी काळदाते, ॲड.डी.एन बोरुळे पाटील, ॲड.एम.डी.कोटलवार, ॲड.व्ही.जी.पवार, ॲड.एस.सी शेख, ॲड.जी.व्ही शेख, ॲड.ए.जे पठाण, ॲड.ए.एच.सय्यद, ॲड.एन.ए. पठाण, ॲड.ए.एस.कांबळे, ॲड.डी.जे मिटकरी, ॲड.ए.ए.पाटील, ॲड.ए.आर.शेख, ॲड.आर.सी.भंडारे, ॲड.के.एस.मणियार, ॲड.संजय सितापुरे, ॲड.एस.एस.नळेगावकर, ॲड.बी.ई.कवठेकर, ॲड.व्ही.व्ही.उगले, ॲड.जी.डी.सातपुते, ॲड.एम.राजमाने ॲड.एस.एन.कुरे, ॲड.बालाजी राजमाने, ॲड.गायत्री नल्ले, ॲड.श्रीकांत मोमले, ॲड.बालाजी व्ही.शिंदे, ॲड.नरेंद्र व्ही.नवखले ॲड.सचिन पी.घाडगे ॲड.भारत एच.ननवरे ॲड.संजय पैठणे, ॲड.शशिकांत सुर्यवंशी या विधीज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
No comments