राग - द्वेष - मोह- माया हेच मानवाचे खरे शत्रू... - भिक्खु महाविरो थेरो लातूर, (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भगवान बुद्धांनी ब...
राग - द्वेष - मोह- माया हेच मानवाचे खरे शत्रू... - भिक्खु महाविरो थेरो
लातूर, (उत्तम माने)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भगवान बुद्धांनी बुद्धत्वप्राप्तीनंतर मानवांच्या दुःखाचे मूळ शोधले जगाचा कर्ता करविता कोण ? याचा विचार न करता माणसाने दुःखमुक्त कसे व्हावे. यावर विशेष भर दिला.बुद्ध म्हणतात आपला शत्रू बाहेरच्या जगात कोणीच नाही आपल्या मनात जो क्लेष रुपी शत्रू आहे. ज्यांना राग, द्वेष, मोह,म्हटले आहे. तेच आपले प्रमुख शत्रू आहेत असे प्रतिपादन भिक्खु महाविरो थेरो यांनी वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे, बुद्ध धम्म वर्षावास पुनित पर्वा निमित्त आयोजित उपासक / उपासिका संस्कार शिबिर प्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,जेवढे वाईट तुमचे बाहेरील शत्रू करणार नाहीत. तेवढे वाईट तुमचे कुमार्गाला गेलेले मन करते. जेवढे चांगले आपले माता पिता आप्तेष्ट करणार नाहीत तेवढे भले पवित्र मार्गाला गेलेले मन करते. मनाचे विकार हेच दुःखाचे मूळ कारण आहे. जे मन अनित्य आहे आहे,पंच इंद्रियाद्वारे मानवाला तृष्णेचा गुलाम करायला लावते.
त्या मनाचे व सतत बदलणाऱ्या शरीराचे आपण मालक नाहीत. म्हणून मानवी दुःखास कारणीभूत असणाऱ्या अविद्या व तृष्णा यांचा नाश करा. तरच माणूस सुखी होईल असेही ते यावेळी म्हणाले..
रविवार सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत हे संस्कार शिबिर संपन्न झाले. प्रथम भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पमाला अर्पण करून बुद्ध बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी महावितरणचे डेप्युटी इंजिनिअर शीलरत्न सूर्यवंशी, सेवानिवृत्त इंजिनियर डी. के. मोरे व एमपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल सिद्धांत गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरास आयु. दिक्षाराणी व विनोद खटके यांनी भोजनदान दिले. यावेळी माजी नगरसेवक सचिन मस्के, भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाअध्यक्षा आशा चिकटे, राजू कांबळे, सूर्यभान लातूरकर, गौतम चिकाटे, दामू कोरडे, हरिश्चंद्र सुरवसे, उत्तम गायकवाड, त्र्यंबक कवठेकर, कुमार सोनकांबळे, महिला मंडळापैकी लताबाई चिकटे, शकुंतला नेत्रगावकर, शीला वाघमारे, शारदा वाघमारे, सविता चिकाटे, लताबाई कांबळे, मीरा शेळके, अस्मिता दांडे, लता शृंगारे, निलूबाई कांबळे आदी लातूर शहरातील बौद्ध उपासक / उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केशव कांबळे यांनी केले शेवटी धम्मपालन गाथेने व आशीर्वचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments