adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कल्पना बारवकर यांनी सांगली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला..!! कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळख..!!

  कल्पना बारवकर यांनी सांगली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला..!! कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळख..!!  सौ. कलावती गवळी ( सांग...

 कल्पना बारवकर यांनी सांगली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला..!! कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळख..!! 


सौ. कलावती गवळी ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सांगली जिल्ह्याच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कल्पना बारवकर यांनी गुरुवारी दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला, सांगली जिल्ह्याचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्यापासून सांगली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक पद हे चांगलेच रिक्त होते, सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा पुन्हा एका अनुभवी महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविली आहे, कल्पना बारवकर या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते, सध्या अमरावती शहरांत पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या कल्पना बारवकर यांचा पोलीस सेवेतला प्रवास 2007 साली अकोला येथून सुरू झाला, त्यानंतर त्यांनी बुलढाणा औरंगाबाद विविध ठिकाणी त्यांनी जबाबदारी पार पाडली होती, 2015 मध्ये त्यांना भंडारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती, तर पुणे पोलीस आयुक्तालयात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात व नांदेड परिक्षेत्रातही महत्वाची भूमिका बजावली आहे, दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे, त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि नेतृत्वगुण जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी चांगलाच उपयुक्त ठरणार आहे असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे, सांगली जिल्ह्याचे यापूर्वीचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून मनीषा दुबळे, आँचल दलाल डूडी तर रितू खोकर यांनीही पोलीस अधीक्षक पदावर  उत्कृंष्ट सेवा दिली, सांगलीच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कल्पना बारवकर या चौथ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत

No comments