adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमोदा येथे पुन्हा अपघात! ट्रक नाल्यात घसरला – चालक किरकोळ जखमी

  आमोदा येथे पुन्हा अपघात! ट्रक नाल्यात घसरला – चालक किरकोळ जखमी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील आमोदा येथी...

 आमोदा येथे पुन्हा अपघात! ट्रक नाल्यात घसरला – चालक किरकोळ जखमी



इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील आमोदा येथील मोर नदीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. आज दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास फैजपूरकडे जाणारा मालवाहू ट्रक (क्र. RJ 11 GC 8233) वळणावर ब्रेक न लागल्यामुळे थेट छोट्या पुलाजवळील नाल्यात घसरला. सुदैवाने या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून मोठी जीवितहानी टळली आहे.

कालच या रस्त्यावरील गतिरोधक हटवण्यात आले होते. काही स्थानिक नागरिकांनी यापूर्वी झालेल्या बस अपघातासाठी गतिरोधक जवळ अचानक ब्रेक लावल्यामुळे दुर्घटना घडल्याचे कारण मांडले होते. त्यामुळे प्रशासनाने हे गतिरोधक हटवले होते. मात्र, आता पावसाळ्यात रस्ता अधिकच धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

 दरवेळी अपघात होणाऱ्या या ठिकाणचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, या ठिकाणी आजचा हा अपघात होता .योग्य ती सुधारणा करून अपघात रोखावे, अशी मागणी ट्रकचालकासह परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

No comments