साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न घोषित करा चोपडा तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे ऑल इंडिया ब्लू टायगर सेना या...
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न घोषित करा
चोपडा तहसीलदार यांच्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे ऑल इंडिया ब्लू टायगर सेना यांच्याकडून मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऑल इंडिया ब्लू टायगर सेना जळगांव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांची चोपडा तहसीलदार यांच्याकडे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नांवे आज रोजी विविध मागणीचे निवेदनाद्वारे
खालील मागण्या १ ऑगस्ट पर्यंत मान्य करण्याबाबत
१) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना १ ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न पुरस्कार घोषित करावा.
२ ) मातंग समाजाला १ ऑगस्ट रोजी अ ब क ड उपवर्गीकरणानुसार आरक्षण जाहीर करावे.
३) दिनांक १ ऑगस्ट रोजी केंद्र स्तरावर महाराष्ट्र सह इतर राज्यातील कार्यालयामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करावी.
४) मुंबई शहराचे नाव बदलून डॉ.अण्णा भाऊ नगर किंवा साठे नगर करावे.
५) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील निधी वाढवुन जाचक अटी शिथिल कराव्या.
आदरणीय पंतप्रधान साहेब,
जय लहुजी! जय भीम ! जय संविधान !
आपणास विनंतीपूर्वक निवेदन सादर करण्यात येते की,
१) पहिल्या मागणीप्रमाणे डॉ.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य हे साहित्य क्षेत्रात अजरामर असल्याने आपण त्यांना साहित्य क्षेत्रात अमूल्य असे योगदान असल्यामुळे भारतरत्न पुरस्कार त्वरित जाहीर करावा, कारण कलाक्षेत्रातील लता मंगेशकर, क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर यांना पुरस्कार दिला जातो. परंतु साहित्य क्षेत्रात संपूर्ण जगामध्ये आपले साहित्य घेऊन जाणारे आणि तितक्याच प्रतिभेने विचार मांडणारे साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे हे भारतरत्न पुरस्कारापासून वंचित का आहेत ? असा
प्रश्न निविदाबांद्वारे विचारण्यात येते. कारण शासकीय नियमानुसार भारतरत्न पुरस्कार, जो भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, तो 'अपवादात्मक सेवा' किंवा 'उच्च दर्जाचे कार्य' करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. हे कार्य कोणत्याही क्षेत्रात असू शकते, जसे की कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा. मग साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य तर साहित्य क्षेत्रात अजरामर आहे . तर त्यांना आतापर्यंत पुरस्कार का देण्यात आला नाही? म्हणून आपणास नम्र विनंती आहे की , आपण त्वरित भारतरत्न पुरस्कार डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी १ ऑगस्ट रोजी जाहीर करावा.ही विनंती.
२) दुसऱ्या मागणीप्रमाणे अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागणीनुसार मातंग समाजाला उपवर्गीकरणानुसार आरक्षण देण्याचे आश्वासन दिनांक २० मे २०२५ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर सकल मातंग समाजाच्या महा आक्रोश महामोर्चा मध्ये आपल्या सरकारमधील महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे आले होते आणि त्यांनी मातंग समाजाला त्वरित उपवर्गीकरणानुसार आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. तरी या आश्वासनाची पूर्तता करावी आणि मातंग समाजाला तात्काळ अबकड वर्गवारी नुसार आरक्षण द्यावे ही विनंती.
३) तिसऱ्या मागणीनुसार साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे हे भारतातील राष्ट्रपुरुषांमध्ये येतात . परंतु त्यांच्या जयंतीनिमित्त भारतातील कोणत्याच शासकीय कार्यालयामध्ये सुट्टी नसते आणि बऱ्याच कार्यालयामध्ये डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात येत नाही. म्हणून या दिवशी शासकीय कार्यालय मध्ये सुट्टी असावी आणि शासकीय कार्यालयामध्ये डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी करावी ही विनंती.
४) चौथ्या मागणीनुसार , सध्या महाराष्ट्रतील मुंबईमध्ये मराठी वरून संघर्ष सुरू आहे . परंतु मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात मुंबई आणि मराठी भाषा वाचवण्याचे कार्य डॉ.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या शाहीरीद्वारे आणि लेखणीद्वारे महाराष्ट्र मध्ये मराठी माणसात साहित्यातून अंगार फुलविणारे प्रतिभावंत लेखक म्हणून डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्याकडे पाहिले जाते. गुजरात मध्ये मुंबईला नेण्यापासून वाचविण्याची कार्य डॉ.अण्णाभाऊ साठे यांनी केले आहे . त्यामुळे मुंबई शहराचे नाव बदलून अण्णाभाऊ नगर किंवा साठे नगर करावे ही विनंती.
५) पाचव्या मागणीनुसार, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ मध्ये मातंग समाजाला आपल्या व्यवसायासाठी शासकीय निधी मिळण्याची तरतूद केली आहे . परंतु या आर्थिक विकास महामंडळाला अतिशय सरकारी गॅरेंटरच्या जाचक अटी सह इतरही जाचकटी असल्याने मातंग समाज हा या आर्थिक लाभापासून वंचित आहे . त्यासोबतच या आर्थिक विकास महामंडळाला अतिशय अल्प निधी उपलब्ध झाल्याने मातंग समाजाची उन्नती रखडली आहे म्हणून जाचक असे शितील करून मातंग समाजाला न्याय द्यावा ही विनंती.
तरी आपण मातंग समाजाच्या उज्वल भविष्याकरिता वरील सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि मातंग समाजाला न्याय द्यावा ही विनंती.अशा आशयाचे निवेदनाद्वारे ऑल इंडिया ब्लू टायगर सेना जिल्हाध्यक्ष श्री गायकवाड यांचे मागणी केलेली आहे

No comments