महाराजस्व समाधान शिबीरात आमदार जावळेंनी ऐकली दिव्यांग युवकाची व्यथा, प्रांताधिकारी तहसीलदारांनी तातडीने केले समाधान रावेर प्रतिनिधी मुबा...
महाराजस्व समाधान शिबीरात आमदार जावळेंनी ऐकली दिव्यांग युवकाची व्यथा, प्रांताधिकारी तहसीलदारांनी तातडीने केले समाधान
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उपविभागीय व तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर
ठिकाण -कुंभारखेडा
तारीख - २८ जून २०२५, वेळ - सकाळी १०.०० वाजता सदर शिबिरात खालील प्रमाणे दाखले / योजनेचा लाभ उपस्थित लाभार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला यामध्ये खिरोदा प्र. यावल, महसूल मंडळातील बहुसंख्य लाभार्थी / ना सदर शिबिरामध्ये योजनेच्या आवश्यक कागद पत्रासह उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला या शिबिरात खिरोदा प्र यावल महसूल मंडळातील लाभार्थ्यांना पुढीलप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणी करून लाभ देण्यात आला
1. जातीचा दाखले, उत्पन्न दाखले, डोमीसाईल व इतर शैक्षणिक दाखले
2. शिधा पत्रिका
3. संजय गांधी योजना
4. पंचायत समितीच्या विविध योजना
5. कृषी विभागाच्या योजना
6. महिला व बाल विकास विभागाच्या योजना
7. शिक्षण विभागाच्या योजना
6. वन विभागाच्या योजना
7. भूमि अभिलेख विभागाच्या योजना
8. आरोग्य विभागाच्या योजना
9. पशुधन विभागाच्या योजना
या शिबिराला रावेर यावल मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा. अमोल भाऊ जावळे उपस्थित होते. या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात
शिबिरादरम्यान घडलेला एक हृदयस्पर्शी प्रसंग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. शिबिरात गौरव छोटू भालेराव या दिव्यांग युवकाने आमदार अमोलभाऊ जावळे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. युवकाची व्यथा ऐकून आमदार जावळे यांनी विलक्षण तत्परता दाखवली. त्यांनी तात्काळ फैजपूरचे उपविभागीय अधिकारी मा. बबनराव काकडे आणि रावेरचे तहसीलदार मा. बंडू कापसे यांना घटनास्थळी बोलावले.
अधिकाऱ्यांनीही आमदारांच्या सूचनेनुसार त्वरित कार्यवाही करत निराधार अनुदान योजनेअंतर्गत अर्ज स्वीकृत करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली. मंजुरी मिळाल्यानंतर स्वतः उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कुंभारखेड्याचे सरपंच भरत बोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष अँड. प्रा. सूर्यकांत देशमुख, कपिल चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी गौरव भालेराव यांच्या घरी जाऊन मंजुरीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. या तात्काळ निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थ व लाभार्थ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, “समाधान शिबिर हे केवळ नावापुरते नसून, ते कृतीतून समाधान देणारे ठरत आहे" हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्रामस्थांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे मनःपूर्वक कौतुक करत आभार मानले.



No comments