adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाढदिवसानिमित्त जितेंद्र पाटील यांच्याकडून आधार आदिवासी सेवाश्रमात शालेय साहित्य व मिठाई वाटप

 वाढदिवसानिमित्त जितेंद्र पाटील यांच्याकडून आधार आदिवासी सेवाश्रमात शालेय साहित्य व मिठाई वाटप जळगाव प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आ...

 वाढदिवसानिमित्त जितेंद्र पाटील यांच्याकडून आधार आदिवासी सेवाश्रमात शालेय साहित्य व मिठाई वाटप


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

आपला वाढदिवस आपण दरवर्षी आपल्या आप्तेष्टांना सोबत घेऊन साजरा करतो. पण ज्या कोवळ्या मुलांचं या जगात कुणी नाही अशांना आपलंसं करून सोबत घेऊन आनंद साजरा करण्यात खरोखर मनापासून आनंद व समाधान मिळते, असे उद्गगार आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी यावेळी बोलताना काढले.


आपला वाढदिवस आधार आदिवासी सेवा आश्रमाच्या मुलांसोबत साजरा करून समाजापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे,असे मान्यवरांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.याप्रसंगी शिवतेज, माहिती अधिकार व पत्रकार संघटना आणि आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित होते. जितेंद्र पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवा करत असुन संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना निरोगी व सुदृढ जीवन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.


पाटील यांच्या सामाजिक कार्याचे अनेक मान्यवरांकडून कौतुक केले. तसेच काही नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याचे संस्थेचे सहसचिव संदिप ब्रम्हे यांनी कळविले आहे.

यात धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल,खासदार श्रीकांत शिंदे, तृप्ती देसाई, नविनसेठ गवळी( नगरसेवक ),उमेशदादा गुंजाळ ( नगरसेवक ) रवींद्रदादा पाटील ( नगरसेवक )आदी मान्यवरांची शुभेच्छापत्रे प्राप्त झाले आहेत.

________________________

No comments