adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साकळी जवळील वळणावर दुचाकीस दुचाकीची धडक, एक ठार.

 साकळी जवळील वळणावर दुचाकीस दुचाकीची धडक, एक ठार.  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : तालुक्यातील साकळी या गावाज...

 साकळी जवळील वळणावर दुचाकीस दुचाकीची धडक, एक ठार. 



भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : तालुक्यातील साकळी या गावाजवळ अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर या चोपडा कडून यावल कडे येत असलेल्या दुचाकी ला यावल कडून चोपडाकडे जात असल्याने दुचाकी चालकाने जबर धडक दिली यामध्ये एक ४५ वर्षीय इसम हा ठार झाला. तर समोरील दुचाकी स्वार हा जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपड्या कडून यावल कडे दुचाकी क्रमांक एम. एच. १९ इ. बी. ५४४२ या दुचाकी द्वारे राजेंद्र रमेश सपकाळे- कोळी वय ४५ रा. वढोदे हे येत होते. दरम्यान साकळी गावाजवळ रामजी जिनिंगच्या पुढील वळणावर यावल कडून चोपड्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम. एच.१९ इ. एल. ७७५३ वरील चालक विकास प्रकाश पवार रा. साळशिंगी ता.बोदवड याने जवळ धडक दिली. या अपघातामध्ये रमेश सपकाळे कोळी हे ठार झाले. तेव्हा या अपघाता प्रकरणी संदीप सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दुचाकी चालक विकास पवार यांच्याविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे.

No comments