adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे सेवानिवृत्त शिक्षक एन.बी.पाटील यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न

इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे सेवानिवृत्त शिक्षक एन.बी.पाटील यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न   विका...

इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे सेवानिवृत्त शिक्षक एन.बी.पाटील यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न 


 विकास पाटील -:- धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धरणगाव येथे सेवानिवृत्त शिक्षक एन.बी.पाटील यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न झाला

या कार्यक्रमात संस्थेचे चेरमन-डी.जी.पाटील अध्यक्षस्थानी विराजमान होते तर सचिव-सी.के.पाटील,मुख्याध्यापिका- सुरेखा पाटील तर दिवाणी न्यायाधीश सत्र न्यायालय,इस्लामपूर येथील गुलाबरवजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक ए.एस.पाटील यांनी केले.यावेळी संस्थेच्या पदाधिकारी यांनी सत्कार मूर्ती एन.बी.पाटील यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांनी आपल्या मनोगतातून "तुमच्या सहकाऱ्याचे शाळेसाठी योगदान हे अतुलनिय होते शाळा त्यांना कधीही विसरू शकत नाही”अशा भावनिक भावना व्यक्त केल्या.यांच्या सह सरांची मुलगी हेमांगी पाटील,विद्यार्थ्यांमधून जान्हवी पाटील,सेवानिवृत्त शिक्षक डी.एम.पाटील,सेवानिवृत्त पर्यवेक्षक आर.एस.पडोळ,संस्थेचे सचिव सी.के.पाटील,शिक्षक पंकज कोळी,आरती जैन ,यांनी आपल्या मनोगतातून सरांविषयी त्यांच्या कार्याची महती सांगितली.

“सेवानिवृतीनंतर आपण आता दोघेही समाजसेवेचे व्रत स्वीकारावे”असं प्रतिपादन प्रमुख पाहुणे दिवाणी न्यायाधीश गुलाबरावजी पाटील यांनी केले.अध्यक्षीय मनोगतातून डी.जी.पाटील यांनी सरांच्य कार्याविषयी  प्रामाणिकपणाचे गुणगाण गायले.

33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर हे कर्मचारी दि.31मार्च रोजी सेवानिवृत्त झाले होते

एन. बी.पाटील हे विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती याकाळात त्यांनी नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविले,नाशिक विभागीय बोर्डाचे कामकाज, दैनंदिन अध्यापन,विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमआदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे हीत कसे साधता येईलअसा विचार करत विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. कार्यालयीन विषय ते सहज हाताळत होते.त्यांचे कार्य उल्लेखनिय आहे.

सत्काराला उत्तर देताना,एन.बी.पाटील म्हणाले की, “या संस्थेचे आमच्या आयुष्यावर भरपूर उपकार आहेत,यामुळेच आमची ओळख आहे तुम्ही केव्हाही आवाज द्या आम्ही तयार आहोत’असे प्रतिपादन केले

या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी हजेरी लावली व सत्कार केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी सहकार्य केले. सूत्रसंचालन भारती पाटील व रुपाली राठोड यांनी केले तर आभार  स्वरूप पाटील यांनी मानले.

No comments