adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सात महीन्यापासुन फरार असलेला रोड रॉबरी करणारा आरोपी धरणगांवच्या गुन्ह्यात फरार होता तर अमळनेरचा गुन्हा उघडकीस आणला स्थानिक गुन्हे शाखा जळगांव कडुन अखेर जेरबंद

  सात महीन्यापासुन फरार असलेला रोड रॉबरी करणारा आरोपी धरणगांवच्या गुन्ह्यात फरार होता तर अमळनेरचा गुन्हा उघडकीस आणला  स्थानिक गुन्हे शाखा जळ...

 सात महीन्यापासुन फरार असलेला रोड रॉबरी करणारा आरोपी धरणगांवच्या गुन्ह्यात फरार होता तर अमळनेरचा गुन्हा उघडकीस आणला

 स्थानिक गुन्हे शाखा जळगांव कडुन अखेर जेरबंद 


अमळनेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव पोलीस स्टेशन गु.र.क्रं.४६०/२०२४ बीएनएस २०२३ चे कलम ३०९ (४),३(५) प्रमाणे दाखल दिंनाक १६/१२/२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्याचा समातंर तपास स्थानीक गुन्हे शाखा जळगाव कडील पोहवा संदीप पाटील,पोहवा प्रविण मांडोळे करीत असतांना, मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन तसेच भौगोलीक परीस्थितीजन्य पुराव्यावरुन सदरचा गुन्हा निष्पन्न करुन, सदरचा गुन्हा हा १) अभिजीत भरतसिंग राजपुत वय २७ वर्ष रा.मळाणे (वणी) ता.जि.धुळे,२) अक्षय उर्फ घोडा भिमराव पाटील (बागुल) वय २१ वर्ष रा.तामसवाडी ता. पारोळा जि जळगाव ३) संभाजी पाटील रा.सातरणे ता.जि.धुळे ४) अजय भाईदास थोरात रा. महाराष्ट्र वाईन शॉप जवळ.नवलनगर ता.जि. धुळे यांनी संगणमत करुन केला असल्याचे निष्पन्न केले होते.त्यावरुन अक्षय उर्फ घोडा भिमराव पाटील (बागुल) वय २१ वर्ष रा.तामसवाडी ता. पारोळा जि जळगाव यास ०५/०२/२०२५ रोजी नमुद गुन्हयात अटक करण्यात आली होती.परंतु त्याचे साथीदार नामे १)अभिजीत भरतसिंग राजपुत वय २७ वर्ष रा.मळाणे (वणी) ता.जि.धुळे,२)अजय भाईदास थोरात रा. महाराष्ट्र वाईन शॉप जवळ.नवलनगर ता.जि.धुळे ३) संभाजी पाटील रा.सातरणे ता.जि.धुळे हे गुन्हा घडल्यापासुन पोलीसांच्या अटकेपासुन स्वताचे अस्तित्व लपवुन वावरत होते.सदरचा गुन्हा करण्याची पूर्ण योजना आरोपीत अभिजीत भरतसिंग राजपुत याची होती. तेव्हापासुन आजतागायत धरणगाव पोलीस तसेच स्थानीक गुन्हे शाखा जळगाव कडील पथक वर नमुद पाहीजे आरोपींचा शोध घेत होते. परंतु नमुद आरोपीत पोलीसांना मिळुन येत नव्हते म्हणुन अशा प्रकारच्या गुन्हयाना आळा बसावा म्हणून सदरच्या पाहीजे आरोपीतांचा शोध घेणेबाबत संदीप पाटील,वरीष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,पोहवा संदीप पाटील,हरीलाल पाटील,प्रविण मांडोळे,पोशि राहुल कोळी,मपोशि दर्शना पाटील,चापोशि महेश सोमवंशी अशांचे पथक तयार केले होते.


दिंनाक २६/०७/२०२५ रोजी स्थानीक गुन्हे शाखा जळगाव च्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार आरोपीत नामे अभिजीत भरतसिंग राजपुत वय २७ वर्ष रा.मळाणे (वणी) ता.जि.धुळे हा त्याच्या मुळ गावात आला असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली होती. त्यावरुन वर नमुद पथकाने नमुद गावात सापळा रचला असता,नमुद आरोपीत अभिजीत राजपुत यास कुणकुण लागताच नमुदचा आरोपीत पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला परंतु पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. नमुद आरोपीताकडे तपास पथकाने चौकशी केली असता,नमुद आरोपीताने अमळनेर पोलीस स्टेशन कडील गु.र.क्रं.५६३/२०२४ बीएनएस २०२३ चे कलम ३०९ (६) प्रमाणे दिंनाक ०७/१२/२०२४ रोजी दाखल हा त्याच्या वर नमुद साथीदार यांच्यासहीत केला असल्याची कबुली दिली आहे.नमुद आरोपीतास स्थानीक गुन्हे शाखा जळगाव च्या पथकाने अमळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.इतर ०२ पाहीजे आरोपीतांचा पोलीस शोध घेत आहेत. नमुद गुन्ह्याचा पुढील सखोल तपास अमळनेर पोलीस करीत आहेत. नमुद आरोपीत याचा अभिलेख तपासला असता, सदर आरोपीतावर खालीप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अ.क्र. पोलीस स्टेशन चे नाव जिल्हा

गु.र.क्रं.व कलम ०१) सोनगीर पोलीस स्टेशन

धुळे.१२१/२०२० भादवि कलम ३९२,३४

०२)धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे. १२१/२०२२ भादवि कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४,२०१

०३) अमळनेर पोलीस स्टेशन जळगाव,५६३/२०२४ बीएनएस २०२३ चे कलम ३०९ (६).

०४)धरणगाव पोलीस स्टेशन जळगाव ४६०/२०२४ बीएनएस २०२३ चे कलम ३०९ (४),३(५)

सदरची कारवाई डॉ महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगाव,कविता नेरकर अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव परीमंडळ,अशोक नखाते अपर पोलीस अधिक्षक जळगाव,विनायक कोते उपविभागीय पोलीस अधिकारी,अमळनेर भाग अमळनेर,संदीप पाटील,वरीष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,पोहवा संदीप पाटील,हरीलाल पाटील,प्रविण मांडोळे,पोशि राहुल कोळी,मपोशि दर्शना पाटील,चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली आहे.

No comments