adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर पाणीटंचाईच्या समस्या चार दिवसांत सोडवण्याचे मुख्याधिकारींचे आश्वासन

  फैजपूर पाणीटंचाईच्या समस्या चार दिवसांत सोडवण्याचे मुख्याधिकारींचे आश्वासन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर शहरातील ...

 फैजपूर पाणीटंचाईच्या समस्या चार दिवसांत सोडवण्याचे मुख्याधिकारींचे आश्वासन


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरातील तडवी वाडा, झोपडपट्टी व इस्लामपुरा भागातील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या दोन गंभीर समस्या – अंगणवाडी केंद्रासाठी जागेचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई या संदर्भात फैजपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदने सादर केली आहेत. दोन्ही निवेदनांची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकारी यांनी चार दिवसांच्या आत दोन्ही समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन नागरिकांना दिले आहे.


१. अंगणवाडी क्र. ७४ साठी सुरक्षित व कायमस्वरूपी जागेची मागणी

तडवी वाडा झोपडपट्टी परिसरातील अंगणवाडी केंद्र क्र. ७४ ही सध्या अत्यंत अपुरी व असुरक्षित जागेत कार्यरत आहे. येथे लहान मुलांना पोषण आहार, शिक्षण व माता आरोग्यसेवा दिल्या जातात. परंतु जागेच्या अभावामुळे या सुविधा प्रभावीपणे पोहोचत नाहीत. बालविकास प्रकल्प अधिकारी, जळगाव उत्तर (भुसावळ) यांनीही सदर परिसराची पाहणी करून दिनांक १ जुलै २०२५ रोजी पत्र क्र. २१८ द्वारे नगर परिषदेला जागा उपलब्ध करून देण्याची शिफारस केली आहे.

रहिवाशांनी प्रस्तावित केले की, झोपडपट्टीजवळील झेड.पी. शाळा क्र. १ व पाण्याच्या टाकीजवळ मोकळी जागा अंगणवाडी केंद्रासाठी उपयुक्त ठरू शकते. योग्य निर्णय घेतल्यास मुलांना आणि महिलांना योग्य सुविधा सहज उपलब्ध होतील.

२. इस्लामपुरा आणि झोपडपट्टीतील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

प्रभाग क्र. ३ मधील इस्लामपुरा आणि झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो आणि त्यातही पाण्याचा दाब खूपच कमी असतो. अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचतच नाही. महिलांना रांगेत उभं राहावं लागतं, वृद्ध व लहान मुलांनाही मोठा त्रास होतो आहे. काही गल्लीपर्यंतच पाणी पोहोचते, बाकी भाग पाण्याविना वंचित राहतो.

नागरिकांनी स्वतंत्र जलवाहिनी, पंपिंग सुविधा किंवा दाबवाढीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. यासोबतच, वेळेत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. नगर परिषद मुख्याधिकारींचे लेखी आश्वासन

संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत फैजपूर नगर परिषदेचे मा. मुख्याधिकारी यांनी दोन्ही समस्यांचे निराकरण चार दिवसांच्या आत करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की निवेदन सादर करतांना MPJ शहर प्रमुख रहिमिद्दिन, उपाध्यक्ष महाले सर इक्बाल खान, निजामुद्दीन भाई,शाकीर एहसान कुरैशी खान,बाबा भाई,शाहरुख कुरेशी व महिला उपस्थित होते.

No comments