adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश

  जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सद्य परिस्थितीत विविध द...

 जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सद्य परिस्थितीत विविध देशांमध्ये चाललेल्या युद्धांमुळे संपूर्ण जगात अशांतीचे वातावरण पसरलेले आहे. रशिया आणि युक्रेन, इराण व इस्राईल आदी रक्तरंजित गंभीर युद्धात गुंतत असताना भारतासारख्या शांतिप्रिय देशातून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला जात आहे. या मोलाच्या कार्यात खारीचा वाटा उचलत जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी शांतीचा संदेश प्रस्थापित करणारे गीत सादर करत सर्वांसाठी एक आदर्श प्रस्थापित केला आहे. 

      युद्धाच्या सद्य भयावह परिस्थितीत अनेक निष्पाप व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे, असंख्य लोक जखमी झाले आहेत; तसेच अनेक प्रकारच्या संकटांना तोंड सुद्धा द्यावे लागत आहे. युद्धाचे गंभीर परिणाम लक्षात घेता, शाळेचे प्राचार्य मोझेस जाधव यांनी विद्यार्थ्यांना युद्धाच्या परिणामांची कल्पना देवून भावी पिढीचे नागरिक म्हणून भविष्यात युद्धापासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शांतिप्रिय बनावे असा संदेश दिला. तसेच देशाचे नागरिक म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. प्रत्येक बुधवारी शाळेत शिक्षकांद्वारे नैतिक कथा सादर केल्या जातात, तर विद्यार्थ्यांद्वारे विविध गीतांचे सादरीकरण केले जाते. व याच कार्यक्रमात इयत्ता नववीच्या रुचिका बोरोले, सुजान तडवी व गुंजन इंगळे यांनी "टेल मी.. व्हॉट वॉर इज फॉर" हे युनिसेफ द्वारा प्रस्तुत गीत सादर करत शांतीचा संदेश दिला व युद्धात प्राण गमावलेल्या अनेक निष्पाप जीवांना श्रद्धांजली अर्पण केली.

       यावेळी शाळेचे प्राचार्य मोझेस जाधव, पर्यवेक्षिका पूनम नेहेते, शाळेतील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संपूर्ण विद्यार्थी उपस्थित होते.

No comments