adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेल्या सिग्नलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत -:- जिल्हा उपप्रमुख अजय टप

 शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेल्या सिग्नलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत -:- जिल्हा उपप्रमुख अजय टप  अमोल बावस्कार बुल...

 शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेल्या सिग्नलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत -:- जिल्हा उपप्रमुख अजय टप 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर -:- शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेल्या सिग्नलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी शहर पोलिस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास येत्या १२ ऑगस्ट २०२५ पासून अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून  त्यांनी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर शहरामध्ये बुलढाणा रोडवरील तहसील चौक, हनुमान चौक, टी-पॉईंट यासह आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. सदरचे ट्राफीक सिग्नल बसविण्याचे काम सुरू होते, त्यावेळी आपणाकडे सदर सिग्नलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत लेखी निवेदन २० मे २०२५ रोजी सादर केले होते. मात्र आजरोजी सिग्नल बसविण्याचे काम पुर्णही झाले आणि ते कार्यान्वितही करण्यात आले. मात्र सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्यात आले नाहीत.

शहरातील बुलढाणा रोड हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. तर एखादवेळी अपघात घडल्यास त्या अपघातातील वाहनाचा तपास करण्यासाठी ह्या सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास त्याचा फायदा होवू शकतो. तसेच शहरात अनेकदा चोरीच्या घटना घडतात. मात्र चोरट्यांचा सुगावा लागत नाही. बरेच कोठे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत का? याची माहिती काढून त्या कॅमेर्‍यामध्ये काही सुगावा मिळतो का याचा तपास पोलिसांना करावा लागतो. त्यामुळे आजरोजी सिग्नल लावण्यात आलेल्या बुलढाणा रोड हा मुख्य मार्ग असून या मार्गानेच इतर ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहेत. त्यामुळे अशा चोरीच्या घटना घाडल्यास सीसीटीव्ही त्या सिग्नलवर असतील तर त्याचा फायदा नक्कीच तपासाकामी होवू शकतो. त्याचप्रमाणे महिला व मुलींच्या छेडखानीसारख्या घटनांनाही याचा नक्कीच उपयोग होवू शकेल. त्यामुळे शहरात लावण्यात आलेल्या सिग्नलवरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी अजय टप यांनी केली आहे.

No comments