धनाजी नाना महाविद्यालयात मियावाकी घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभ इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथील तापी परिसर विद्या...
धनाजी नाना महाविद्यालयात मियावाकी घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभ
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात मा लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मियावाकी घनवन प्रकल्प वृक्षारोपण समारंभाचे आयोजन दिनांक ८ जुलै २०२५ मंगळवारी दुपारी तीन वाजता महाविद्यालय परिसरात आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, अध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर हे असतील तर उद्घाटक म्हणून माननीय श्री व्ही एल माहेश्वरी कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण समारंभ पार पडणार आहे. अशी माहिती धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी पत्रकारांना दिली.
याप्रसंगी श्री राजेंद्र नन्नवरे, मा राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य, श्री सचिन नांद्रे संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यासहित तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री मिलिंद शंकर वाघुळदे, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सहसचिव प्रा नंदकुमार आसाराम भंगाळे, सदस्य प्रा मधुकर चुडामण पाटील, सदस्य श्री ओंकार वामन सराफ, सदस्य श्री संजय काशिनाथ चौधरी, सदस्य माजी प्राचार्य डॉ शशिकांत सदाशिव पाटील, सदस्य श्री हरिष थावरदास वसंतदाणी यांच्यासहित प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे , प्राचार्य डॉ राजेश यादव चौधरी, प्राचार्य डॉ रवींद्र एल चौधरी, यांच्या सहित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
स्वर्गीय लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी *हिरवा सातपुडा अभियान* यशस्वीपणे राबवले. त्यांच्या संकल्पनेतून सातपुड्याच्या जंगलात जे भारतीय प्रजातीच्या औषध वनस्पती, वृक्ष आहेत त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. याच संकल्पनेचा एक भाग म्हणून महाविद्यालयात *मियावाकी घनवन प्रकल्प* राबविण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठासहित हिरवांकुर फाउंडेशन, नाशिक यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. याआधी राबविण्यात आलेल्या मियावाकी घनवन प्रकल्पामुळे परिसरातील तापमान लक्षणीय घट बघावयास मिळत असून याचा फायदा परिसरातील नागरिकांना व्हावा या उदात्त हेतूने सदर उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितीचे आवाहन मा प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळ अध्यक्ष श्री शिरीषदादा चौधरी व सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय यांचे मार्गदर्शन लाभत असून प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
No comments