हाडगा जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वारकरी पालखी सोहळा उत्साहात निलंगा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) निलंगा, दि.०७)शिक्षणाची वारी ...
हाडगा जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वारकरी पालखी सोहळा उत्साहात
निलंगा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
निलंगा, दि.०७)शिक्षणाची वारी आपल्या दारी जि. प. के. प्रा. शा. हाडगा, ता. निलंगा येथे आषाढ़ी एकादशी निमित्त पालखी सोहळा उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
माऊली माऊली, विठ्ठल नामाची शाळा भरली , पंढरीचा विट्ठल कुणी पाहीला,विठुरयाची पंढरी इत्यादी भजने अभंग विद्यार्थ्यांनी सादर केले. ग्रामस्थ, महिला भगिनी, शिक्षक, विद्यार्थी,आंगनवाड़ी ताई यानी फुगड़्या व फेर धरूण दिंडित सहभागी झाले. या सोहळ्यात पालखीत विठ्ठल रुक्मिणी मूर्ती ठेवण्यात आले होते.
या कार्यक्रमात गावातील सरपंच सौ. अनुपूर्णाताई वाघमारे, शा.व्यवस्थापण. समिती अध्यक्ष खंडू भोकरे , माता पालक भगिनी व शाळेतील मु.अ.श्री. दिवे डी. आर., राजेश मंदाडे,डी के सूर्यवंशी , विजयसिंह पाटील, राजेश्री भिसे ,अंजना बरेवाड़, कल्पना लामतुरे ,कौशल्या कांबळे,विद्यामती पांचाळ यांनी सहभाग घेतला.
No comments