विरावली येथे कृषीकन्यांनी कृषी मेळाव्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या केला संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विराव...
विरावली येथे कृषीकन्यांनी कृषी मेळाव्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या केला संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरावली (ता. यावल) येथे दिनांक २८ जुलै २०२५ रोजी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. मोहनमाला नाझिरकर (तहसीलदार, यावल) व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. कालिमा तडवी (सरपंच, विरावली) यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्रीमती. शबाना तडवी (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी शेती व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्राध्यापक. बी. एम.गोणशेटवाड व प्राध्यापक.के. ए. बोनसोडे, मा. श्रीमती छाया पाटील (ग्रामसेविका, विरावली), व ईश्वर पाटील (उपसरपंच, विरावली) तसेच श्री.देविदास धनराज पाटील (ग्रामपंचायत अधिकारी बामणोद), श्री.मिलिंद देविदास भोळे (क्लर्क ग्रामपंचायत बामणोद)उपस्थित होते.
कृषी मेळाव्याचे या मेळाव्यात विरावलीसह, बामनोद ,तांदलवाडी, नायगाव, थोरगव्हाण व केऱ्हाळे येथील विद्यार्थ्यांचे व गावातील गावकऱ्यांचे सहभाग होता.कृषी महाविद्यालयाचे शिक्षक प्रा. बी.एम. गोणशेटवाड (कार्यक्रम समन्वयक) व प्रा. एम. पी.भोळे (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषीकन्या सृष्टी डोंगरे व आकांक्षा काकडे यांनी केले, तर सहकार्य करण्यासाठी कृषीकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, प्रतीक्षा गावित, विशाखा सोनावणे, साक्षी बाहेकर, पूर्वजा कुमावत, दीपाली पाटील, हर्षदा पावरा व ऋतिका उघडे यांनी केले.
No comments