adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महामार्गावर रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश..

 महामार्गावर रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश..  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर ...

 महामार्गावर रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश.. 



सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि३०):-नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर धर्मनाथ टिकाराम जोहरे (रा.गारखेडा परिसर छत्रपती संभाजी नगर) हे नेवासा फाटा छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असतांना त्यांना एका स्विफ्ट कार चालकाने छ.संभाजीनगर येथे सोडतो असे म्हणुन कार मध्ये बसवुन घेतले आणि काही अंतरावर गेल्यावर चाकुचा धाक दाखवून व मारहाण करुन त्यांच्या कडील रोख रक्कम्, लॅपटॉप,मोबाईल फोन,घड्याळ  काढून घेवून उतरवून दिले.या बाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अंमलदार यांनी  घटना ठिकाणचे व आजुबाजुचे रोडचे सी.सी.टी. व्ही. फुटेज चेक करुन आरोपीबाबत माहिती जमा करून महेश शिरसाठ यांनी आणि त्याच्या एका साथीदाराने केला असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी सापळा रचून

महेश आबासाहेब शिरसाठ वय २६ वर्षे, रा. म्हसले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, २) गौरव शहादेव शिरसाठ वय २५ वर्षे, रा. सदर ) यांना पकडले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल फोन,रोख रक्कम, गुन्ह्याच्या वेळी वापरलेली कार, मोबाईल,चाकु असा एकुण ६,००,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार सुरेश माळी,फुरकान शेख, सोमनाथ झांबरे,संदीप दरंदले, प्रमोद जाधव,किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे,उमाकांत गावडे,महादेव भांड यांनी केली आहे.

No comments