.. अखेर अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने मोठा वाघोदा येथे पालकांनी वर्गांना ठोकले कुलूप प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी शाळेत महीला पालकवर्गाने...
.. अखेर अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने मोठा वाघोदा येथे पालकांनी वर्गांना ठोकले कुलूप
प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी शाळेत महीला पालकवर्गाने नेला होता मोर्चा!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बु येथील प्रकाश विद्यालयात अकरावीसाठी प्रवेश मिळत नसल्याने पालकांनी वर्गांना कुलूप लावत्याचा प्रकार 30जुलै बुधवारी रोजी घडला. महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये प्रथम व द्वितीय फेरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाहीत. प्रकाश विद्यालयात अकरावी विज्ञान शाखा ही गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींना गावातच शिकता यावे याकरता सुरू करण्यात आली होती मात्र शासनाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे गावातीलच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील की काय, अशी भीती विद्यार्थी व पालकांमधून व्यक्त करण्यात येत
काही दिवसांपूर्वी विद्यार्थी व पालक यांनी शाळेमध्ये मोर्चा नेत प्रवेशासाठी ठिय्या आंदोलन केले होते. तरीही आजपावतो प्रवेशासाठी कुठलाही निर्णय न लागल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक यांनी शाळेवर धडक देत मोर्चा नेऊन अकरावीच्या वर्गाला कुलूप लावले व आपला रोष व्यक्त केला.
यावेळी चक्रधर शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव किशोर पाटील, संचालक पी. एल. महाजन, कुलदीप पाटील यांनी सर्व विद्यार्थी व पालकांची समजूत काढली व आम्ही गावातील विद्याथ्यांसोबतच आहोत, मात्र शासनाच्या ऑनलाइन प्रवेश धोरणामुळे शासन निर्णयानुसार शाळेला प्रवेश द्यावी लागत आहेत. मात्र याविषयी आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करीत आहोत. लवकरात लवकर प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासन संचालक मंडळांने दिले.
महीला पालकवर्ग प्रतिक्रिया
पुढील शिक्षणासाठी आम्ही बाहेरगावी का जावे ?
आमच्या पात्यांना प्रवेश मिळाला नाही तर आम्ही बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवणार नाही व ग्रामीण भागातील पालक मोलमजुरी करीत असून बाहेरगावी शिक्षण घेणे हे परवडणारे नाही म्हणून आम्ही आमच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का, असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला.
विद्यार्थ्यी प्रतिक्रिया
तसेच आमचे शिक्षण पहिलीपासून ते आजपर्यंत या शाळेत झाले आहे. पुढील शिक्षणासाठी आम्ही बाहेरगावी का जावे, असे मत विद्याथ्यांनी मांडले. तरी महाराष्ट्र शासन व शिक्षण विभाग यांनी आम्हाला आमच्या गावातच प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करावे व आम्हाला शिक्षणापासून वंचित होण्यापासून वाचवावे, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे
No comments