वित्तीय साक्षरता अभियान आणि भव्य कर्ज वाटप मेळावा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी महा...
वित्तीय साक्षरता अभियान आणि भव्य कर्ज वाटप मेळावा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक यावल शाखा यांनी यावल तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना आर्थिक साक्षरता व भव्य कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातील एकूण 10 स्वयंसहायता समूहांना 30.25 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले. सदरील मेळाव्यासाठी मा. श्री सचिन सूर्यभान काकडे शाखा व्यवस्थापक यावल , श्री शरद शेंडे आणि अमोल झाडे MSRLM यावल यांची प्रमुख उपस्थीती होती.
सदरील मेळाव्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक सखींचा सत्कार करण्यात आला. तसेच बँकेचे कर्ज घेऊन वैयक्तिक व सामूहिक व्यवसाय करणाऱ्या उद्योजक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते यावल तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांना टना कर्ज मंजुरी पत्र व प्रतिनिधीक स्वरूपातील चेक चे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सचिन काकडे सर यांनी बँकेच्या विविध योजना व त्यातून मिळणारा लाभ याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. बँकेच्या कर्जातून महिलांनी स्थानिक पातळीवर विविध उद्योग व्यवसाय निर्माण करावे व ऑनलाईन स्तरावर माध्यमांचा वापर करून त्याची विक्री चांगल्या प्रकारे करावी असे आवाहन केले. तसेच त्यांनी गटांना कर्ज वितरण कोणत्याही अडकाठी शिवाय व जास्तीत जास्त रक्कम देण्याचे ही आश्वासन दिले.
उमेद चे तालुका समन्वयक अमोल सर आणि शेंडे सर यांनी उमेद गटाविषयी सविस्तर माहिती दिली व कर्ज परतफेडीचे प्रमाण शंभर टक्के राहील याची ग्वाही दिली. यावल शाखेची अधिकारी जानवी खोडे, वैशाली नगराळे व रोखपाल चेतन सिंह राजपूत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. शाखेचे शिपाई महेश खाचणे, भूषण महाजन व बँक सखी अश्विनी कोळी यांनी उपस्थित होते, यावल सारख्या ग्रामीण भागात जवळजवळ शतकी महिलांच्या उपस्थितीत भव्य असा कर्जवाटप मेळावा आयोजित करण्यात आला व उमेद मधील महिलांनी कार्यक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
No comments