adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महागडे स्मार्टवॉच व टॅब चोरणाऱ्या महिलेस तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात

 महागडे स्मार्टवॉच व टॅब चोरणाऱ्या महिलेस तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (२०...

 महागडे स्मार्टवॉच व टॅब चोरणाऱ्या महिलेस तोफखाना पोलिसांनी घेतले ताब्यात 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (२०):-सॅमसंग कंपनीचा टॅब व स्मार्ट वॉच चोरणाऱ्या  महिलेस तोफखाना पोलिसांनी  ताब्यात घेत ६०,०००/- रु. किं.चा.मुद्देमाल सदरील महिलेकडून हस्तगत केला आहे.बातमीची हकीकत अशी की,महेशकुमार बन्सीलाल चांडक (वय ५७ वर्षे,धंदा नोकरी, रा.२ अमोल अपार्टमेन्ट, रासनेनगर, सावेडी,ता.जि अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली की,त्यांचा मुलगा अथर्व हा बेंगलोर येथून सुट्टीसाठी दि.१७ जुलै २०२५ रोजी घरी आला होता.त्यानंतर मुलगा अथर्व यास दि.१९ जुलै २०२५ रोजी दुपारी ०१/०० वा.चे सुमारास त्याचा सॅमसंग कंपनीचा टॅब व सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच मिळून आले नाही,म्हणून त्यांनी त्यांच्या राहत्या घरात शोध घेतला असता त्यांना ४०,०००/- रु.कि.चा सॅमसंग कंपनीचा टॅब व २०,०००/- रु कि.चे सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच मिळून नाही वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन तोफखाना पो.स्टे येथे गुन्हा रजि ७६७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तात्काळ घटना ठिकाणी जावून पाहाणी करुन गोपनिय बातमीदार यांना माहिती देवून गुन्ह्याचे चक्रे फिरवली असता गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,सदरचा गुन्हा अंजली कुलकणी (रा. सिध्दार्थनगर) हिने केल्याची बातमी समजल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,म.पो.ना जिजा खुडे,पोकॉ. सुजय हिवाळे,सतिष त्रिभुवन यांनी अंजली कुलकणी रा. सिध्दार्थनगर हिच्यापत्यावर जावुन शोध घेतला असता ती मिळून आल्याने तिस ताब्यात घेवून घेवून तिच्याकडे गुन्ह्यातील गेल्या मालाबाबत विचारपुस केली असता तीने सदर गुन्हा केल्याची कबुली देवून ४०,०००/- रु किंचा सॅमसंग कंपनीचा टॅब व २०,०००/- रु किं.चे सॅमसंग कंपनीचे स्मार्ट वॉच असा एकूण ६०,०००/- रु किं.चा मुद्देमाल समक्ष हजर केल्याने तो गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आला.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,म.पो.ना.जिजा खुडे,पोकॉ.सतिष त्रिभुवन, पो.कॉ.सुजय हिवाळे यांनी केली आहे

No comments