adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

१ ग्रॅम (फॉर्मिंग ज्वेलरी) सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस..!! कोलार राज्य कर्नाटकांतून आरोपींच्या पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!!

 १ ग्रॅम  (फॉर्मिंग ज्वेलरी) सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस..!! कोलार राज्य कर्नाटकांतून आरोपींच्या पुण्याच्या विश्रामबाग पोल...

 १ ग्रॅम  (फॉर्मिंग ज्वेलरी) सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस..!! कोलार राज्य कर्नाटकांतून आरोपींच्या पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!! 


सौ. कलावती गवळी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुणे शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाणेत भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१ (४) अन्वये दाखल गुन्हयात यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०६/०७/२०२५ रोजी रात्री १२.५० वा. सु. ते ०१.२० वा. सु. चे दरम्यान फिर्यादी यांचे आर.जे. ज्वेलर्स, १३१४, बुधवार पेठ, बाजीराव रोड नु.म.वि. शाळेशेजारी, पुणे-०२ असे १ ग्रॅम ज्वेलरी (फॉर्मिंग ज्वेलरी) चे दुकानात एक अनोळखी व्यक्ती अंगाने सडपातळ अंदाजे वय २० ते २५ वर्षाचे दरम्यान, दाट कुरळे केस असलेला, तोंडावर काळा मास्क, पांढ-या रंगाचा हाफ बाह्यांचा टि शर्ट व जिन्स पॅन्ट परिधान केलेला, पाठीवर सेंक असलेला याने फिर्यादी यांच्या दुकानाचे दुस-या मजल्यावरील वॉशरुमचे खिडकीतुन फिर्यादी यांच्या परवानगी शिवाय प्रवेश करुन लबाडीचे उद्देशाने फिर्यादी यांच्या दुकानातील एकुण किं.अं. ४,७४,०००/- रुपये किंमतीचा एक ग्रॅम सोन्याची (फॉर्मिंग ज्वेलरी) चा माल चोरुन नेला फिर्यादी यांनी त्या अनोळखी व्यक्ती विरोधांत कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथकांचे अधिकारी राजेश उसगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस अन्याबाबत सूचना केल्या होत्या. 


त्या अनुषंगाने  विश्रामबाग पोलीस ठाणेकडील तपासी पथकांने तांत्रीक विश्वलेषन व २३० ते २५० सी.सी.टीव्ही कॅमेरे चेक करुन संशयित हा जंगमगुर्जन हल्ली, पो. अरनहल्ली ता. जि. कोलार राज्य कर्नाटक ) येथील असल्याचे समोर आले  संशयित इसमांस ताब्यांत घेण्याकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर व पोअं/८२९२ अशिष खरात, पोअं/८६९१ राहुल गोरे, पोअं/ ९८२० अनिस शेख, पोअं/१००१६ शिवदत्त गायकवाड असे मिळुन कोलार जिल्हयात जावुन लोकल पोलीस ठाण्याची मदत घेवुन अज्ञात इसमांच्या राहते घरी जावुन शोध घेतला असता संशयित इसम मिळुन न आल्याने त्याच्या राहत्या घरची घरझडती पंचासमक्ष घेतली असता चोरी करणार संशयित इसम यांने पायात परिधान केलेला सॅण्डल, बैंग (सेंक) तसेच इंजिनिअरिंगचे कॉलेजचे आयकार्ड, व मोबाईल मिळुन आल्याने सदर मोबाईल चेक केला असता मोबाईल मध्ये १ ग्रॅम सोन्याचे फोटो व आरोपींच्या हाताच्या जखमेचे फोटो मिळून आल्याने व सदरच्या वस्तु सीसीटीव्ही मधील हुबेहुब दिसुन आल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपीं नामे ( लिखीत जी. वय १९ वर्षे रा. जंगमगुर्जनहल्ली, पो. अरनहल्ली ता. जि. कोलार राज्य कर्नाटक) याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मिळुन न आल्याने ४ दिवस आरोपी ज्या ज्या ठिकाणी येतो त्या त्या ठिकाणी लोकल पोलीसांची मदत घेऊन ट्रॅप लावुन आरोपीस गांधीनगर, कोलार, राज्य कर्नाटक येथुन ताब्यात घेवुन आरोपींकडूंन गुन्ह्यातील गेला माल १ ग्रॅम सोन्याचे वेगवेगळे दागिन्यांची किंमत ४,७४,०००/- रुपायांचा शंभर टक्के मुद्देमाल कौशल्य पूर्ण तपास करुन हस्तगत करण्यात आला असुन संशयित आरोपींस दिनांक १६/०७/२०२५ रोजी मा. न्यायालया समोर हजर केले असता त्याला दिनांक १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली असुन.  सदर गुन्हयाचा तपास  आधिक तपास स.पो.नि. पांडुरंग वाघमारे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त संजय बनसोडे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1चे कृषिकेश रावले सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके पोलीस निरीक्षक (गुन्हे) तसेच राजेश उसगांवकर सहायक पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार सचिन कदम गणेश काठे अमोल भोसले शैलेश सुर्वे सचिन अहिवळे आशिष खरात राहुल मोरे अनिस शेख शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात, नितीन बाबर सागर मोरे व प्रशांत कदम यांनी केलेली आहे.

No comments