Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा येथील नवीन पुलावर चिखलाचे साम्राज्य पावसाच्या पाण्यामुळे अनेक नागरिक जखमी श्रीकृष्ण मंदिरांत गुरुपौर्णिमेला हजारो भाविकांची उपस्थिती

  मोठा वाघोदा येथील नवीन पुलावर चिखलाचे साम्राज्य  पावसाच्या पाण्यामुळे अनेक नागरिक जखमी श्रीकृष्ण मंदिरांत गुरुपौर्णिमेला हजारो भाविकांची उ...

 मोठा वाघोदा येथील नवीन पुलावर चिखलाचे साम्राज्य 

पावसाच्या पाण्यामुळे अनेक नागरिक जखमी श्रीकृष्ण मंदिरांत गुरुपौर्णिमेला हजारो भाविकांची उपस्थिती 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बु येथे नुकतेच  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत देखरेखीखाली या नवीन पुल बांधण्यात आला याच नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला खरवा,गाळयुक्त  मातीमिश्रीत भराव टाकल्यामुळे पुलासह दोन्ही बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे 


संपुर्ण परिसरच चिखलमय झाल्यामुळे या पुलावरून रहदारी वापर करणाऱ्या ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच मनस्ताप ही सहन करावा लागत आहे मोठे वाघोदा बु ता. रावेर    येथील मध्यवर्ती भागातून वाहत असलेल्या नाल्यावरील पुलावर ग्रामविकास मंत्रालयाच्या नागरिक मूलभूत सुविधा पंचवीस पंधरा निधी अंतर्गत मंजूर झालेल्या पुलाचे काम पूर्ण होऊन यावर सध्या रहदारीसह वाहतूक सुरू झाली आहे परंतु पुलाचे दोघी बाजूने खरवा मातीमिश्रीत गाळयुक्त  भराव संबंधित कॉन्ट्रॅक्टर द्वारे टाकला गेला मात्र या दोघंही बाजूला टाकलेल्या भरावाने चिखलाचे रुप धारण केले व पुलाचे दोन्ही बाजूला चिखलाने साम्राज्य केले आहे याच चिखलमय पुलावरून ग्रामस्थांना चिखल तुडवीत पायवाटेने वापरावे लागत असून  गावातील वृद्ध वयोवृद्ध नागरिक तसेच लहान बालक यांना या पुलावरून  वापरतांना असह्य त्रास सहन  करावा लागत आहे तसेच याच पुलावरून शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत शालेय शिक्षणासाठी  शाळेत जाण्यासाठी हाच मार्ग असून त्यांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी सार्वजनिक बांधकाम उप विभाग सावदा शाखा अभियंता संबंधित कॉन्ट्रॅक्टर व ग्रामपंचायत प्रशासन शासनाने तात्काळ लक्ष द्यावे विशेष दिनांक 10जुलै रोजी गुरुपौर्णिमा दिनी मोठा वाघोदा बु येथे महानुभाव पंथाचे 5मंदिरांत  अनुयायी गुरु दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी होतात तरी संबंधितांनी सदर पुलावर अतिशय चिखल होत असल्याने त्यावर दगडी मुरूम टाकण्यात यावे जेणेकरून जेष्ठ नागरिक यांना त्रास कमी होईल  अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

No comments