गावठी कट्टा विक्री करण्याकरता आलेला इसम एलसीबी च्या जाळ्यात सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि९):-राहाता ...
गावठी कट्टा विक्री करण्याकरता आलेला इसम एलसीबी च्या जाळ्यात
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि९):-राहाता तालुक्यातील कोल्हार येथून विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत आरोपीकडून 1 गावठी कट्टा व 02 जिवंत काडतुस जप्त करण्यात यश आले आहे. दि.08 जुलै 2025 रोजी पथक लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती काढत असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की,इसम नामे अक्षय राजेंद्र पायमोडे, रा.प्रवरानगर,लोणी,ता.राहाता हा व त्याचा साथीदार यांचेकडे गावठी कट्टा असून ते कट्टयाची विक्री करण्यासाठी कोल्हार भगवतीपूर गावात बेलापूर रोड कुंकलोळ कॉम्प्लेक्स,ता.राहाता येथे थांबलेले आहेत.पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीतील ठिकाणी संशयीत इसमांचा शोध घेऊन दोन संशयीत मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना एक इसम पळून गेला.पथकाने घटना ठिकाणावरून 1)अक्षय राजेंद्र पायमोडे, वय 26, रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले त्याने त्याचे नाव 2) अनिकेत देवेंद्र भोसले, रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता, जि.अहिल्यानगर (फरार) असे असल्याचे सांगीतले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची पंचासमक्ष झडती घेऊन त्याचेकडून 49,000/- रू किंमतीचे एक गावठी पिस्टल, 2000/- रू किं. दोन जिवंत काडतुस, 10,000/- रू किं.त्यात एक मोबाईल असा एकुण 61,000/- रू.किं.मुद्देमाल जप्त करण्यात आला.वर नमूद आरोपीविरूध्द लोणी पोलीस स्टेशन येथे गुरनं 418/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग, श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि/तुषार धाकराव,पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे,मनोहर गोसावी,भगवान थोरात, रमीजराजा आत्तार,सुनिल मालणकर,महादेव भांड यांनी केलेली आहे.
No comments