adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चांदोरीवाडी ते चांदोरी पाटी रस्ता उखडला... औसा मतदार संघातील रस्त्यांची बिकट अवस्था उघड ...

  चांदोरीवाडी ते चांदोरी पाटी रस्ता उखडला... औसा मतदार संघातील रस्त्यांची  बिकट अवस्था  उघड ... निलंगा,दि.०१ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...

 चांदोरीवाडी ते चांदोरी पाटी रस्ता उखडला...

औसा मतदार संघातील रस्त्यांची  बिकट अवस्था  उघड ...


निलंगा,दि.०१ प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मौजे चांदोरीवाडी ते चांदोरीपाटी हे गाव निलंगा तालुक्यात येत असून हे गाव औसा विधानसभा मतदार संघातही येत आहे. मागील अनेक वर्षापासून या गावाला जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. तब्बल १५ वर्षानंतर या रस्त्याबाबत निलंगा तालुक्यातील  पत्रकारांनी आवाज उठवल्या नंतर औसा मतदार संघातील आमदार अभिमन्यू पवार यांनी २०२३ /२०२४ या आर्थिक वर्षा मध्ये या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी ६० लाख रुपये किंमतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. मात्र या रस्ता कामाचे काम मार्च २०२५ मध्ये करण्यात आले.या कामाचे भूमिपूजन विधानसभा   निवडणुकीच्या तोंडावर दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी रस्ता कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.


मात्र हा रस्ता मार्च २०२५ या महिन्यात झाले खरे मात्र हा रस्ता  अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्याने मे आणि जून मध्ये झालेल्या पावसाने उखडून गेला आहे. या रस्ता कामाकडे आमदार अभिमन्यू पवार यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. यावरून चांदोरीवाडी येथील महायुती मधील  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उद्धव मेकाले यांनी लातूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तीन महिन्यात रस्ता उखडल्याचे  लेखी तक्रार देऊन अशी मागणी केली आहे

की,सदरील झालेल्या खराब कामाची चौकशी समिती नेमून दोषी आढळल्यास ठेकेदारावर कडक कारवाई करून गुन्हा नोंद करावा व या रस्त्याचे बिल व देयके संबंधित गुत्तेदारास देण्यात येऊ नये अशी ही मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.

यामुळे आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खात आहे अशी अवस्था आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदार संघात दिसून येत आहे..

No comments