"🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 " कॅन्सरमुक्त जळगाव अभियान" शेतकरी भावांनो _आपला जिल्हा रासायनिक खते वापरात देशात अव्वल असून कीटकनाशक ...
"🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
" कॅन्सरमुक्त जळगाव अभियान"
शेतकरी भावांनो
_आपला जिल्हा रासायनिक खते वापरात देशात अव्वल असून कीटकनाशक बाबत राज्यात नाशिक आणि जळगाव आघाडीवर आहेत._
परिणाम स्वरूप कॅन्सर/हृदयरोग/किडनी सह लहान बालकांना मधुमेह होण्याची समस्या निर्माण होत आहे.आजच एका ३,महिन्याची मुलगी हिला डोळ्यांचा कॅन्सर झाला हे सारे यामुळेच घडत आहे
आम्ही आपणास पूर्णपणे सेंद्रिय च करा असा आग्रह करीत नाहीत परंतु किमान "विषमुक्त अन्नधान्य"(Residue free) खावे त्यासाठी जे विद्यापीठांनी व कृषी विभागानं सांगितलं तेवढेच खत दिले व जगभर बंदी असलेले कीटकनाशक वापरले तर रोग होतील ,पण योग्य मात्रेत व योग्य खते/कीटकनाशक वापरले तर उत्पादन खर्च देखील कमी होईल व विषमुक्त अन्न देखील मिळेल.
यासाठी जिल्हाधिकारी मा आयुष प्रसाद जी,जी प च्या मुख्याधिकारी मीनल ताई करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी अधिकारी कुरबान जी तडवी,कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के साहेब यांच्या टीम ने जिल्ह्यातील मुख्य पिकांचे रासायनिक खतांचे तक्ता तयार केला असून ,जिल्ह्यातील कृषी केंद्रांचे संचालकांची संघटना माफदा यांनी तो प्रिंट करून जिल्हाभर पाठवण्याची व्यवस्था केली आहे.त्या साऱ्यांचे धन्यवाद.
_आपणास विनंती खतांची योग्य मात्रा दिली तर उत्पादन तेवढेच येणार,जास्तीचे दिलेले खत हे जमिनीत पडून राहते किंवा वाया जाते._
उत्पादन खर्च देखील वाचेल व आपल्या कुटुंबियांचे जीवन देखील....यावर्षी किमान ५%खते कमी वापरुया.लवकरच कीटकनाशकांचा देखील चार्ट आपणास देणार आहेत.
आपल्या संपर्कातील जे जे मोबाईल ग्रुप असतील त्यांचा कडे वरील माहिती पाठवा व कॅन्सर मुक्त जळगाव करूया...
आपलाच.
एस बी नाना पाटील व शेतकरी कृती समिती चे सारे सदस्य,चोपडा जी जळगाव

No comments