adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धानोरा परिसरात विजेच्या लपंडाव तांसातासात बत्ती गुल झाल्याने शेतकऱी हैराण (शेतकऱ्यांना सहा तासही वीज मिळेणा पाण्याअभावी पिकांचे नुकसान)

 धानोरा परिसरात विजेच्या लपंडाव  तांसातासात बत्ती गुल झाल्याने शेतकऱी हैराण   (शेतकऱ्यांना सहा तासही वीज मिळेणा पाण्याअभावी पिकांचे नुकसान) ...

 धानोरा परिसरात विजेच्या लपंडाव  तांसातासात बत्ती गुल झाल्याने शेतकऱी हैराण  


(शेतकऱ्यांना सहा तासही वीज मिळेणा पाण्याअभावी पिकांचे नुकसान)

खलील आर तडवी प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा तालुका :धानोरा परिसरातील बिडगाव, मोहरद, कुंडयापाणी, वरगव्हाण अशा एकूण तब्बल १६ गावांमध्ये विजेचा लपंडाव गेल्या काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे त्यात अस्मानी संकटाच्या सामना करावा लागतोय गेल्या १५ दिवसापासून पावसाने दांडी मारली असून शेतकऱ्यांची चिंता दिवसोंदिवस वाढत असल्याने यासंदर्भात शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चक्रा मारत असताना त्यांना उडवा उडवीचे उत्तरे देण्यात येत आहे या गंभीर समस्येमुळे लोकप्रतिनिधींचाही दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे वीज वितरण कंपनीचे सब स्टेशन परिसरातील १६ गावांचा वीज पुरवठा करण्याची जबाबदारी आहे परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती शेती करण्यात येते सध्या शेतकरी मका ,कापूस, केळी, यासह अन्य पिकांना पाणी देत असून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा त्यांना फटका बसत आहे २४ तासाहून शेतीला केवळ ६ तास वीज पुरवठा होत असूनही तासा तासात बत्ती गुल झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना दिवसा व सलग वीज देण्याची गवाही देतात. मात्र त्याला येथे हरताळ फासला गेला आहे सध्या शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करीत आहे त्यात वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे त्याच्या तोंडी आलेला घास हिरावला जात आहे. धानोरा हे बाजारपेठेचे गाव असून येथे वीज वितरण कंपनीचे सब स्टेशन आहे या सबस्टेशन वरून परिसरातील कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो मात्र वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे परिसरातील शेतकरी संकटात आला आहे शेतीसाठी कंपनीकडून सहा तास वीज पुरवठा केली जात असते मात्र अनेक वेळा त्यात विज बंद असल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून शेतीला सलग वीज पुरवठा सुरळीत व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे

No comments