जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य संघटना व स्थानिक रहिवासी यांचे तर्फे पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत तातडीचे निवेदन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ह...
जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य संघटना व स्थानिक रहिवासी यांचे तर्फे पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत तातडीचे निवेदन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रभाग क्रमांक 3 रामपुरा चोपडा येथील रहिवासी यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद चोपडा यांना निवेदन सादर केले असून या निवेदनात म्हटले आहे की आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, आमच्या परिसरात गेल्या 15 दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे. यामुळे रहिवाशांना पिण्याचे पाणी, स्वयंपाक, आणि स्वच्छतेसारख्या दैनंदिन गरजांसाठी 1 ते 2 किलोमीटर पायपीट करून शेतातून पाणी आणावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि असह्य झाली आहे.
याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती रहिवाशांना देण्यात आलेली नाही, ज्यामुळे आमच्या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे. आम्ही आपणास विनंती करतो की, तात्काळ पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत किंवा पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. याची नोंद घ्यावी की, जर पुढील दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरू न झाल्यास किंवा पर्यायी पाण्याची पुरेशी व्यवस्था न झाल्यास,आम्ही रहिवासी कंपोस्ट डेपोत जाणाऱ्या कचरा गाड्या अडवण्यास भाग पडू तरी आपण त्वरित कार्यवाही करावी तरी सदर निवेदन परिसरातील रहिवाशांच्या वतीने सादर करीत आहे. तरी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे
No comments