adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे ई स्कूल मध्ये गोर- गरीब विद्यार्थ्यांना दप्तर- गणवेश वाटप.

 जे ई स्कूल मध्ये गोर- गरीब विद्यार्थ्यांना दप्तर- गणवेश वाटप. मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) समाजाचं आपण का...

 जे ई स्कूल मध्ये गोर- गरीब विद्यार्थ्यांना दप्तर- गणवेश वाटप.


मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

समाजाचं आपण काही देणं लागतो या उद्देशाने मुक्ताईनगरातील काही दातृत्वशील समाज बांधवानी सामाजिक बांधिलकी जपत जे ई स्कूल, मुक्ताईनगर मध्ये  शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते सातव्या वर्गातील मातृ पितृ छत्र हरवलेल्या सुमारे 20 विद्यार्थ्यांना दप्तर आणि गणवेश वाटप करुन मदतीचा हात पुढे केला.त्यासाठी गरजू मुलाची निवड करण्यात आली होती. प्राचार्य व्ही एम चौधरी यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक एस एम वाढे यांनी मुक्ताईनगर शहरातील काही व्यापारी तथा सधन शेतकरी बांधवांची भेट घेऊन अशा काही मुलांसाठी मदती करण्याच्या केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि दात्यांनी  निवडलेल्या मुलांसाठी कुठलाही गवगवा न करता स्वतः कुठेही समोर न येता मदत करण्याचे मान्य केले.तसेच अजून अशी काही गरजू मुलं असतील तर त्यांनाही  मदत देण्याचे मान्य केले.अशा गरजू मुलांना प्राचार्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते  दप्तर,वह्या,गणवेश अशा साहित्याचे  वाटप करण्यात आले.या उपक्रमा बद्दल संस्थेच्या अध्यक्ष ॲड रोहिणी खडसे उपाध्यक्ष  नारायणदादा चौधरी सचिव डॉ सी एस चौधरी आणि सर्व संचालक मंडळाने सर्व दात्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आणि अशा गरजू मुलांच्या शिक्षणाची स्वतः जबाबदारी घेतली.प्रसंगी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक वाढे सर यांनी केले तर आभार  एस आर ठाकुर यांनी मानले.

No comments