adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात कै. वसंतराव रामजी महाजन यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रम

    शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात कै. वसंतराव रामजी महाजन यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रम  भरत कोळी यावल ता. प्रतिनि...

  शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात कै. वसंतराव रामजी महाजन यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध उपक्रम 



भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात कै. वसंतराव रामजी महाजन यांच्या द्वितीय पुण्यस्मरणदिना निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी क्रीडा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा .घेण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे होते तर व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई वसंतराव महाजन, संचालक शामकांत वसंतराव महाजन, दिपक रमेश महाजन, सुनंदाताई बडगुजर, रामाभाऊ निळे, धनराज माळी, गंगाराम कोळी सन्मा. संचालक मंडळ, प्राचार्य आर जे महाजन, पर्यवेक्षक एस. जे पवार, बी ई महाजन, आर सी जगताप, एन पी पाटील, एम ए महाजन, किरण चौधरी, एस पी निळे भाऊसाहेब उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते कै. वसंतराव रामजी महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयांवर वक्तृत्व केले. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यात लहान गटात प्रथम वेदिका मनोज शिरसाळे,द्वितीय- नक्षत्रा हेमंत जोशी तृतीय- आरती विनोद वानखेडे 

तर मोठ्या गटात प्रथम- योगेश संजय बोरसे , द्वितीय- निकिता जगदीश चऱ्हाटे , तृतीय- चेतना रवींद्र बोरसे यांनी वरील प्रमाणे यश मिळविले. तसेच

 क्रीडा स्पर्धेमध्ये पुढील विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवला 

यात वैयक्तिक धावणे स्पर्धा

 **लहान गट* 

 *मुले** 

सचिन विनोद कोळी

वरद संदीप तेली

यश शैलेंद्र जंजाळे

 *मुली* 

 रुचिता समाधान मिस्तरी 

 काजल ज्ञानदेव माळी 

 अक्सा रशीद तडवी 

 **मोठा गट* 

 *मुले** 

 हरीश मनोहर बडगुजर 

 विशाल कैलास कुंभार

 धीरज महेश सपकाळे 

 *मुली* 

 अल्फाज रसूल तडवी 

 दीपिका संदीप तेली 

 भैरवी नितीन सुतार 

 *कबड्डी स्पर्धेमध्ये* 

  ( *मुले* )

 *लहान गट मुले* 

 इयत्ता सातवी संघ 

 *मोठ्या गटात* 

इयत्ता दहावी संघ 

 *खो -खो* 

 *मुली* 

 *लहान गट* 

 इयत्ता सातवी संघ 

 *मोठा गट* 

 इयत्ता आठवी संघ 

 या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कामकाज, पी एम. पाटील,एस. एस. तडवी,वाय बी सपकाळे, एस. बी सोनवणे, ए पी जाधव सर्व क्रीडा शिक्षक यांनी कामकाज पहिले 

     या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय अश स्वरूपाची बक्षीसे देण्यात येणार आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई वसंतराव महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले यात त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व , आरोग्याचे महत्त्व, याविषयी माहिती देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद रमेश सोनवणे यांच्या स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, शालेय जीवनात खेळाचे महत्व, शारीरिक आरोग्य, याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन पी पाटील यांनी केले व आभार वाय बी सपकाळे यांनी मानलेत. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments