शनिवारी "आज की शाम रफी के नाम" चे आयोजन श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी ...
शनिवारी "आज की शाम रफी के नाम" चे आयोजन
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त गेली अनेक वर्षापासून
त्यांना आदरांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करणारे नगर शहरातील संगीतप्रेमी तथा मोहम्मद रफी प्रेमी सईद खान यांनी यावर्षीही मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉल याठिकाणी "आज की शाम रफी के नाम" या फिल्मी गीत संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सईद खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या कार्यक्रमात मोहम्मद रफी यांच्या सदाबहार व अजरामर गीतांचे सादरीकरण अन्वर शेख, आबीद हुसेन, निलेश महाजन, अंजुम पटवेकर, अन्सार शेख, संजय भिंगारदिवे, मुख्तार शेख, विद्या तन्वर, ज्योती भिंगारदिवे, योगिनी अक्कडकर हे करणार असून कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समीर खान हे स्वतः करणार आहेत,
हा कार्यक्रम आगदी वेळेवर सुरू होणार असून यामध्ये सर्वांना प्रवेश विनामूल्य असणार असल्याचे आयोजक सईद खान यांनी सांगितले आहे .
तसेच कार्यक्रमातच विशेष गुणवत्तेसह सी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शिफा शेख अब्दुल अलीम व अमान शेख रफिक यांचा सन्मान करण्यात येणार आहे, तरी सर्व संगीत प्रेमींनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सईद खान यांनी केले प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments