पत्रकारितेच्या क्षेत्रातील चमकता तारा, मोठा वाघोदा येथिल आदिवासी तडवी समाजाची बुलंद तोफ मोठा वाघोदा ग्रामपंचायतचे माजी.सरपंच मुबारक उर्फ र...
पत्रकारितेच्या क्षेत्रातील चमकता तारा, मोठा वाघोदा येथिल आदिवासी तडवी समाजाची बुलंद तोफ
मोठा वाघोदा ग्रामपंचायतचे माजी.सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी (पत्रकार) यांनी आपल्या कार्यातून केळी कामगार मजूर मोलमजुरी करून समाजहित जोपासताना विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आयुष्यचा टप्पा गाठत आज पत्रकारितेच्या क्षेत्रातील चमकता तारा म्हणजे मुबारक तडवी
आसेम,एकता मंच,आदिवासी संघर्ष मोर्चा या संघटना, सामाजिक कार्याची उत्तम जबाबदारी निभावणार, तसेच आपली निर्भिड पत्रकारीतेमुळे भल्या भल्यांना घाम फोडणारे स्पष्ट वक्ता, निर्भिड पणे आपले मत सांगणारे सामुहीक विवाह १ रुपयात सुरु करून प्रत्येक सामाजिक कार्यात तन मन धनाने सहभागी होणारे, समाजासाठी अडचणी आल्यास वेळेवर सोडविण्यासाठी आपला जीव ओवाळून टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात
बिनधास्त पत्रकारिता करतात. त्यांनी आपल्या परिसरातील घडामोडीसाठी वेळोवेळी आपल्या लेखनातून आवाज उठवला ते पत्रकारिता सोबतच 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिले. तर 2004 पासून पत्रकारितेची आवडीने सुरुवात केली समाजाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार समिती ने आदिवासी तडवी भिल समाजावर अन्याय करणे सुरू केल्यावर पुणे येथील अनुसूचित जाती जमाती संशोधन केंद्र TRTIकार्यालयासमोर अविरत तीन दिवस आमरण उपोषणाला आपल्या समाजातील सहकारी समवेत बसले होते अखेर तिढा सुटेपर्यंत उपोषण केले होते आसेम आदिवासी सेवा मंडळ संघटना जिल्हाध्यक्ष, दक्षता समिती अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण पत्रकार जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य प्रसिध्दी प्रमुख मोठा वाघोदा ग्रामपंचायत सरपंच पद ही त्यांनी भुषविले पुन्हा आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना जिल्हाध्यक्ष अविरत तंटामुक्त गाव समिती उपाध्यक्ष स्वस्त धान्य दुकान दक्षता समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशी पद त्यांनी भुषविले तर आपल्या परिसरातील घडामोडीसाठी, समस्यांना न्याय मिळावा यासाठी ते नेहमी धडपड करीत असतात पत्रकार म्हटलं म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ हे आपण सर्वजण जाणतोच पण माझी बातमी सगळ्यात वेगळी कशी असेल हेडिंग कसं चांगले राहिल याची ते दोन ते तिन वेळा खात्री करतात नुसती बातमी न्यूज एजंसी कडे पाठविली कि आपले काम संपल अस काही जण (निवडकच) करतात पण तडवी सर बातमी पोर्टलवर पब्लिश झाल्यावर ही दोन वेळा खात्री करतात थोडी ही जर का चुक लक्षात आली कि ते लगेच फोन करून लक्षात आणतात सर बातमी अशी नको या स्वरूपात घ्याल असे हि मार्गदर्शन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे गुरुवर्य आदरणीय विवेक जी ठाकरे सर यांच्या आशीर्वादाने मि या क्षेत्रात काम करतोय ते आवर्जून सांगतात. वेळोवेळी समाज हितासाठी धावून येतात पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी
मासिक आसेंम संदेश या संपादक तथा संस्थापक राजु बिर्हाम तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी वृत्तपत्राद्वारे पत्रकारितेची सुरुवात केली पत्रकारिता क्षेत्रातील गुरुवर्य आदरणीय विवेक जी ठाकरे सर यांच्या आशीर्वादाने दैनिक देशोन्नती परिवारात सलग 12 वर्ष लिखाण केले नंतर देशाधार, लोकपत्र, साईमत, बातमीदार, पुण्यनगरी, दैनिक भास्कर रावेर तालुका प्रतिनिधी, ठोस प्रहार, सुवर्ण दिप, मध्ये अविरत पत्रकारितात लिखाण कार्य केले तर आज संपादक हेमकांत गायकवाड, व्यवस्थापकीय संपादक शामसुंदर सोनवणे यांच्या आमच्या सोबत नेशन महाराष्ट्र न्यूज ॲड एजंसी, दैनिक भास्कर ला रावेर तालुका सह विभागीय संपादक म्हणून काम सांभाळत आहे त्यांचा आज वाढदिवस ते आज वयाच्या 46 वर्षात पदार्पण करीत आहे त्यांना नेशन महाराष्ट्र टिम, संपूर्ण कार्यक्षेत्रातील थोरा मोठ्यां कडून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शामसुंदर सोनवणे
व्यवस्थापकीय संपादक
नेशन महाराष्ट्र न्यूज ॲड एजंसी
No comments